शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कठोर शिक्षा करा अन्…”, श्वानाला मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून संतापली जुई गडकरी, म्हणाली, “त्या मनोरुग्णाला…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 14, 2024 | 11:12 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Actress Jui Gadkari expressed hier anger by sharing that viral video of beating a dog and She demand to arrest him

"कठोर शिक्षा करा अन्...", श्वानाला मारहाण करतानाचा व्हिडीओ पाहून संतापली जुई गडकरी, म्हणाली, “त्या मनोरुग्णाला..."

व्यक्ती प्राणिप्रेमी असो वा नसो, प्रेम ही भावना प्रत्येकाच्या मनात असतेच. त्यात जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल मग ही भावना आणखीनच उत्कट होते. मराठी मनोरंजन सृष्टीतही अनेक प्राणीप्रेमी कलाकार आहेत. त्यापैकीच यके कलाकार म्हणजे अभिनेत्री जुई गडकरी. जुई ही खूप मोठी प्राणी प्रेमी असून तिच्या घरी अनेक मांजरी आहेत. यावरून तिचं प्राणीप्रेम दिसून येतेच. त्यामुळे तिला एखाद्या प्राण्याला झालेल्या त्रासाविषयी हलहल वाटणे हेदेखील तितकेच साहजिक आहे.

ठाण्यात मुक्या प्राण्यांच्या ग्रूमिंग सेशन सेंटरमध्ये कर्मचाऱ्याने एका श्वानाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पाळीव प्राण्यांची शुश्रूषा करणाऱ्या सेंटरमध्ये श्वानाला मारहाण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरला. हा धक्कादायक प्रकार पाहून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. नुकतीच रितेश देशमुखने यावर प्रतिक्रिया व्यक्त करत मारहाण करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली होती. अशातच आता अभिनेत्री जुई गडकरीनेही यावर संताप व्यक्त केला आहे.

आणखी वाचा – “भारत देश…”, दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांना पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या वागणूकीवर मराठी अभिनेत्रीची नाराजी, म्हणाली, “नुसते जय म्हणून…”

जुईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर करत असं म्हटलं आहे की, “एका स्पा सेंटरमध्ये श्वानाला मारहाण केल्याचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ अतिशय अस्वस्थ करणारा आहे. मी तो व्हिडीओ पूर्ण पाहूदेखील शकले नाही. मारहाण करणाऱ्या त्या मनोरुग्णाला देव नक्कीच चांगली शिक्षा करेल. ज्या हातांनी त्याने मुक्या जीवाला मारहाण केली, ते हात काहीच कामाचे राहणार नाहीत.”

आणखी वाचा – मोठा निर्णय! राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या श्रेणीमध्ये बदल, इंदिरा गांधी व नर्गिस दत्त यांची नावे वगळली अन्…

यापुढे तिने “कृपया हा अत्याचार थांबवा. त्या कर्मचाऱ्याला अटक करा व त्याला कठोर शिक्षा करा.” असे काही हॅशटॅग्सही लिहिले आहेत. तसेच यापुढे तिने “मी आशा करते की, तो श्वान आता सुरक्षित असेल. कृपया यापुढे तुमच्या प्राण्यांना अशा क्लिनिक अथवा स्पा सेंटरमध्ये एकटं पाठवू नका. त्यांची काळजी घ्या” असं म्हटलं आहे. दरम्यान, या व्हायरल व्हिडीओवर अनेक नाटकऱ्यांनी कमेंट्स करत संताप व्यक्त केला असून त्या व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे.

Tags: entertainment newsjui gadkarimarathi actressmarathi entertainmentmarathi entertainment newsMarathi newsजुई गडकरीमनोरंजन बातमीमराठी अभिनेत्रीमराठी बातमीमराठी मनोरंजन
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Dalljiet Kaur Divorce

दलजित कौर व निखिल पटेल यांच्या घटस्फोटाच्या अफवा खऱ्या ठरल्या?, अभिनेत्रीच्या नवऱ्याच्या 'त्या' कृतीने चर्चांना उधाण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.