Amruta Deshmukh Prasad Jawade Marriage : ‘बिग बॉस ४’ मधील लोकप्रिय जोडी अभिनेत्री अमृता देशमुख व अभिनेता प्रसाद जवादे अखेर बोहोल्यावर चढले आहेत. अगदी मराठमोळ्या पद्धतीने त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला आहे. काही दिवसांपासून अमृता-प्रसादच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता या चर्चांना पूर्णविराम देत ही मराठमोळी जोडी लग्नबंधनात अडकली आहे. आज शनिवार (१८ नोव्हेंबर) रोजी अमृता-प्रसाद यांचा पुण्यातील तळेगाव येथे एका फार्महाऊसवर त्यांचा विवाह सोहळा पार पडला. (Amruta Deshmukh And Prasad Jawade Shared Wedding Photos On Social Media)
अमृता-प्रसाद यांच्या या विवाहसोहळ्यासाठी मित्रपरिवार, नातेवाईक व कुटुंबीय हे उपस्थित होते. त्याचबरोबर मराठी मनोरंजनविश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावत त्यांना आशीर्वाद दिले. अनेक कलाकार मित्रांनी त्यांच्या लग्नात धम्माल-मज्जामस्ती केली. याचे काही फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचबरोबर या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अनेक लाईक्स व कमेंट्स करत चांगला प्रतिसादही दिला आहे.
अभिनेता सिद्धार्थ खिरीदने त्याच्या सोशल मीडियाद्वारे या लग्नाचे खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. या फोटोत ऋतुराज शिंदे, ओंकार राऊत, अपूर्व रांजणकर, आशुतोष गोखले, शुभंकर तावडे, रसिक वेंगुर्लेकर, रश्मी अनपट व रेशम आदि कलाकार दिसत आहेत. त्याचबरोबर अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी ‘वेलकम सूनबाई’ म्हणत प्रसाद-अमृताला लग्नानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान या लग्नसोहळ्यात अमृता-प्रसादच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले. या लग्नासाठी अमृताने लाल रंगाचा डिझाईनर लेहेंगा परिधान केला होता. तर प्रसादने पांढऱ्या रंगांची शेरवानी व त्यावर पांढऱ्या रंगाचा फेटा परिधान केला आहे. या लग्नात अमृताचे मंगळसूत्र आकर्षण ठरले. अमृताच्या मंगळसूत्राने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. दरम्यान अमृता-प्रसादच्या लग्नाचे फोटो-व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.