शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“भिमाची पुण्याई…”, स्वतःचं पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदेची पोस्ट, म्हणाला, “आमच्या गावी…”

Kshitij Lokhandeby Kshitij Lokhande
नोव्हेंबर 19, 2023 | 9:27 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Adarsh Shinde share a Post of his Business

"भिमाची पुण्याई…", स्वतःचं पेट्रोल पंप सुरु केल्यानंतर आदर्श शिंदेची पोस्ट, म्हणाला, "आमच्या गावी…"

लोकप्रिय मराठी गायक आदर्श शिंदे याने त्याच्या आवाजातून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे. आदर्शला आजोबा प्रल्हाद शिंदे, वडील आनंद शिंदे व काका मिलिंद शिंदे यांच्या संगीताचा वारसा लाभला आहे. त्याने आजवर अनेक मराठी, हिंदी गाण्यांना आपला आवाज दिला असून त्याच्या प्रत्येक गाण्यावर तरुण-आबालवृद्ध नेहमीच थिरकत असतो. त्यामुळेच तो मराठीतील नावाजलेल्या गायकांमध्ये ओळखला जातो. आता हा गायक त्याच्या नवीन व्यवसायामुळे बराच चर्चेत आला आहे. शिंदे कुटुंबियांनी दिवाळीच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायात पाऊल टाकले. काही दिवसांपूर्वी शिंदे कुटुंबाने पंढरपूर येथे स्वतःचा पेट्रोलपंप सुरु केला. त्याची माहिती आदर्शचा भाऊ व गायक उत्कर्षने दिली होती. आता यावर आणखी एक पोस्ट नुकतंच त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलं. (Adarsh Shinde share a Post of his Business)

आदर्शने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला. ज्यात तो त्याच्या नव्या पेट्रोलपंपाची झलक दाखवताना दिसला. या व्हिडिओमध्ये मोठ्या जागेवर त्याचं नवीन पेट्रोलपंप उभारण्यात आलं असून ‘आदर्श आनंद शिंदे पेट्रोलियम’ अशा नावाची पाटी ठळकपणे झळकत असल्याचं पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना आदर्शने एक पोस्टदेखील लिहिली आहे. ज्यामध्ये तो म्हणाला, “भिमाची पुण्याई. “आदर्श आनंद शिंदे पेट्रोलियम”. माझ्या आईचं स्वप्नं होतं, ते आम्ही पूर्ण केलं. आपलं पेट्रोल पंप असायला पाहिजे असं तिला खूप वर्ष वाटत होतं. आज ते सत्यात घडलं याचा आनंद आहे. एका नवीन विश्वात एन्ट्री केली आहे, बघुया पुढचा प्रवास कसा होईल!”

हे देखील वाचा – असं झालं प्रसाद-अमृताचं शाही लग्न, लेकाला मंडपात पाहून हर्षदा खानविलकरांचा आनंद गगनात मावेना, म्हणाल्या, “सूनबाई…”

तो पुढे म्हणाला, “माझा मोठा भाऊ हर्षद शिंदे याने जर आधार दिला नसता, तर हे शक्य झालं नसतं. कारण या उद्योगाला लागणारा वेळ, मनुष्यबळ आणि विश्वास माझ्या भावाकडे नसता तर हे शक्य झालं नसतं. आमच्या गावी मंगळवेढे इथे अनेक उद्योग करत असताना भाऊ म्हणाला “तू कर मी आहे”. या त्याच्या एका वाक्यामुळे जे बळ मिळालं ते शब्दात मांडता येणार नाही. तुम्हा प्रेक्षकांचं प्रेम आणि आशीर्वाद आहे म्हणून हे सगळं करु शकलो.”, असं म्हणत त्याने त्याच्या चाहत्यांचे व प्रेक्षकांचे आभार मानले आहे.

हे देखील वाचा – शनिशिंगणापूर मंदिराला कळस किंवा घुमट का नाही?, दर्शन घेत अवधूत गुप्तेने सांगितलं खरं कारण, म्हणाला, “अनेक गोष्टी…”

View this post on Instagram

A post shared by Adarsh Shinde | आदर्श शिंदे (@adarshshinde)

आदर्शच्या या पोस्टवर नेटकरी व चाहते कमेंट करत त्याचं कौतुक करत आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीदेखील त्याचे अभिनंदन केले. एकूणच त्याची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे.

Tags: Adarsh ShindeAdarsh Shinde share a Post of his Businessanand shindemarathi singerutkarsh shinde
Kshitij Lokhande

Kshitij Lokhande

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
South Actor Vinod Thomas died

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता विनोद थॉमस यांचं निधन, बंद कारमध्ये सापडला अभिनेत्याचा मृतदेह, नेमकं काय घडलं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.