छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझा होशील ना?” या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. या मालिकेमुळे गौतमी चांगलीच नावारूपाला आली. या मालिकेमुळे तिची बरीच चर्चा रंगली. अशातच नुकतंच गौतमीचा विवाहसोहळा पार पडला. स्वानंद तेंडुलकर या अभिनेता व कंटेट क्रिएटरबरोबर तिने विवाहगाठ बांधली. गौतमी-स्वानंद हे दोघे अनेक दिवसांपासून रिलेशनमध्ये होते. मात्र त्यांच्या नात्याविषयी त्यांनी कधीच खुलासा केला नव्हता. अशातच त्यांच्या मेहेंदीच्या फोटोमुळे त्यांच्या नात्याविषयी सर्वांना माहिती झाली.
गौतमी ही सोहल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. स्वानंद हा कंटेट क्रिएटर व अभिनेता असल्याचे सगळेच जाणतात, पण गौतमी हीदेखील एक मॅकेनिकल इंजिनीअर आहे आणि त्याच संबंधित कामासाठी ती कुठेतरी जात असल्याचे तिने एका व्हिडीओद्वारे सांगितले आहे. हा खास व्हिडीओ शेअर करतच तिने यापुढे तिच्या इन्स्टाग्रामवर आणखी काही फोटो व व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

गौतमीने शेअर केलेल्या फोटो व व्हिडओद्वारे ती Global Auxilaries Systam Team नावाच्या कंपनीमध्ये काम करत असल्याचे दिसत आहे आणि याच कंपनीच्या एका पार्टीसाठी गौतमी गेली आहे. गौतमीने शेअर केलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये काही लोक केक कापत असतानाचे पाहायला मिळत असून हा खास व्हिडीओ शेअर करत तिने “मी या टीमबरोबर गेली ४ वर्षे काम केले आहे.” असं म्हटलं आहे. तसेच गौतमीने ती काम करत असलेल्या डेस्कचादेखील एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोवर तिने “पाच वर्षांपूर्वी हा माझा डेस्क होता” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – “८४ वर्षांच्या आजीने…”, संकर्षण कऱ्हाडेने सांगितला चाहतीचा खास किस्सा, म्हणाला, “डोळ्यांत पाणी आलं अन्…”
या खास पार्टीमध्ये गौतमी तिच्या पूर्वीच्या ऑफिसमधील काही मित्रमैत्रीणींसह खूपच एन्जॉय करताना दिसत आहे. तसेच हे खास फोटो शेअर करत तिने “आम्ही आमच्या काही जुन्या आठवणी पुन्हा एकदा तयार करत आहोत.” असं म्हटलं आहे. दरम्यान, तिच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर रंगभूमीवर सध्या तिचे ‘गालिब’ नावाचे नाटक सुरु आहे. यात तिच्याबरोबर अभिनेता विराजस कुलकर्णीदेखील आहे.
