कलाकार हा नेहमी कौतुकासाठी भुकेला असतो. आपण सादर करत असलेली कला ही समोरच्याला आवडणे व ट्याने त्या कलेचं कौतुक करणे ही एखाद्या कलाकरासाठी मोठीच गोष्ट असते. पुरस्कार किंवा बक्षीसामार्फत कलाकारांचे कौतुक होणे हे कलाकाराला आवडतेच. सोशल मीडियाद्वारे टर कलाकारावर कौतुकाचा कर्षाव होत असतोच. पण तेच कौतुक एखाद्या चाहत्याने प्रत्यक्षात भेटून केल्यास कलाकार आणखीनच भावुक होतो. असाच काहीसा अनुभव एका मराठी अभिनेत्रीलादेखील आला आहे. (Shivani Kulkarni On Instagram)
झी मराठी वाहिनी वरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मालिकेतील अक्षरा ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे शिवानी रांगोळे. शिवानीने नुकताच एक विमान प्रवास केला. ज्यात तिला विमान कर्मचाऱ्यांकडून तिच्या कामाची पोचपावती मिळाली आहे. नुकतीच शिवानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक खास पोस्ट शेअर करत याची माहिती दिली आहे. शिवानीने विमान सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरचे काही खास फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने “तुमच्या कामाचे कौतुक करणाऱ्या लोकांशी मैत्री होणे याचा एक वेगळाच आनंद आहे. तुम्ही केलेल्या प्रशंसेसाठी व तुमच्या प्रवासासाठी धन्यवाद,” असं म्हटलं आहे.
तसेच या विमान कर्मचाऱ्यांनी शिवानीसाठी एक खास नोटदेखील लिहिली आहे. यात त्यांनी शिवानीचे कौतुक करत असे म्हटले आहे की, “प्रिय शिवानी, तुझे या विमान प्रवासामध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. तुमच्याबनरोबर प्रवास करणे हे आमच्यासाठी आनंददायी आहे. ‘आम्ही दोघी’ या मालिकेतील मधुरा या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी तुमचे धन्यवाद, यापुढेही आमचे असेच मनोरंजन करत राहा. तुम्हाला तुमच्या पुढील कारकीर्दीसाठी व या प्रवासासाठी शुभेच्छा. हर्षल राणे आणि नामीरा शेख कडून खूप खूप धन्यवाद.”
हेही वाचा – “आज एक स्वप्न…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने घेतलं नवीन घर, खास फोटो पोस्ट करत म्हणाली…
दरम्यान, शिवानीने आजवर अनेक् मालिका व चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तसेच तिने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. तसेच तिचे कौतुक केले आहे.