प्रेक्षकांच्या मनात अल्पावधीत घर कारण तुफान विनोदी कार्यक्रम म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. दिवसभरातल्या सगळया थकावटी वर एक रामबाण उपाय म्हणून महाराष्ट्रभरातील जनता या कार्यक्रमाकडे पाहते. अनेक वेगवेगळ्या विषयांवर विनोदीशैलीतून भाष्य करत या कार्यक्रमाने वेळोवेळी विनोदसोबतच सामाजिक संदेश ही दिला. सोनी मराठी वाहिनीवरील या कार्यमच जगभर होणार कौतुक हे त्या मधील कलाकारांना प्रोत्सहन देणार ठरतंय.(New Actress in MHJ)
समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, शिवली परब, रोहित माने, प्रभाकर मोरे, अरुण कदम यांसारख्या अनेक कलाकारांच्या अभिनयाने बहरलेल्या या कार्यक्रमात आता आणखी एका कलाकाराची एन्ट्री झालेली पाहायला मिळते. सुंदरा मनामध्ये भरली मालिकेतील अभिनेत्री गौरी किरण सुद्धा आता हास्याच्या या मंचावर प्रेक्षकांचं मनोरंजन करताना दिसणार आहे. त्या संदर्भात हास्यजत्रेतील काही फोटो गौरीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून पोस्ट केले आहेत.

गौरी ने त्या फोटो च्या कॅप्शन मध्ये लिहीलय ‘ आज हसण्याचा थोडासा डोस मी पण देणार बरं का! नक्की पहा महाराष्ट्राची हास्यजत्रा
आज रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वर!
हास्यजत्रेच्या संपूर्ण टीम ला खूप धन्यवाद . छान सांभळून घेतलं तुम्ही(New Actress in MHJ)
हे देखील वाचा – ‘सारी दुनिया एक तरफ, महेश कोठारे माझ्या साठी एक तरफ!’ आणि लक्ष्याच्या या एका ओळीने महेश कोठारेंना धीर आला
गौरीने कॅप्शन मधून हास्यजत्रेतील कलाकारांचे देखील आभार मानले आहेत.