आई कुठे काय करते ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते. मालिका सध्या रंजक वळणावर पाहायला मिळते. या मालिकेत ईशा आणि अनिश यांच्या लग्नाचा ट्रक पाहायला मिळतो.पण अनिरुद्ध हा नेहमीसारखाच अरुंधतीचा विषय निघताच चिडतो पण यावेळी अनघा ही अनिरुद्धला टोमणा देते. हे नुकतंच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळतंय.(Anagha Anirudha)
प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये,अभि कांचन आईचं चेकअप करायचं असं सांगतो व मी आईला देखील सांगितलं तिचंही चेकअप करायचं आहे हे बोलतो. तेव्हा अनिरुद्ध तिची काळजी नको करू अरुंधतीची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा आहे असं म्हणतो. हे ऐकून अनघा असा नवरा सगळ्यांना मिळत नाही ना असं म्हणते तेव्हा अनिरुद्ध चिडतो. तर दुसरीकडे आशुतोष अरुंधतीला तू गाडी चालव असं म्हणत चावी तिला देतो.
तर आजच्या भागाच्या सुरवातीला ईशा तिच्या आईच ऐकूनच घेत नाही. अरुंधती तिची समजूत काढत असते तेव्हा तू हे मुद्दाम करते,झाला का माझ्या थोबाडीत मारून असे अनेक प्रश्न विचारते. ही लग्न करण्याची योग्य वेळ नाही तू आधी शिक्षणाकडे असं लक्ष दे हे अरुंधती ईशाला समजावते पण, ईशा अरुंधतीवर चिडते. मी माझे निर्णय घेऊ शकते.तुझ्यामुळे बाबा आता मला घराच्या बाहेर पाठवणार नाही असं ती म्हणते. तर अरुंधती खोलीतून निघून जाते.(Anagha Anirudha)
हे देखील वाचा – केसात गजरा,नाकात नथ,सईच्या फोटोंची चाहत्यांना भुरळ
अरुंधती केळकरांच्या घरी जाताच देशमुखांच्या घरी काय झालं असं अनिश विचारतो,सुलेखा ताई ,आशुतोष देखील चौकशी करतात. तेव्हा यश अनिश फिरकी घेत बाबा आता ईशाला उद्याच कुठे तरी घेऊन जाणार आहे असा बोलतो. पण अरुंधती अखेर अनिश तू तुझ्या आई बाबांना बोलून घे असं म्हणताच, सर्वजण चकीत होतात. तेव्हा अरुंधती ईशा-अनिशचा साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला हे सांगते. हे ऐकून सगळे जण आंनदी होतात. तर दुसरीकडे देखील संजना अनघा हीच गुडन्युज ईशाला देतात. तिची मस्करी करतात.(Anagha Anirudha)
ईशाला तिच्या चुकीची जाणीव होताच ती आईला कॉल करून तिची माफी मागते. अनिश आणि ईशा यांच्या साखरपुड्याची तयारी देशमुख आणि केळकर यांच्या घरी पाहायला मिळणार,तर यात अनिरुद्ध विघ्न अण्णांर का? हे पाहणं आता उत्सुकतेचं आहे.