मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“बऱ्याच कलाकारांना मोठं केलं, पण मला काम दिलं नाही”, केदार शिंदेंच्या मावशी चारुशीला साबळेंचा खुलासा, काम देण्याचं वचन देऊन…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 25, 2025 | 6:00 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Charusheela sable on kedar shinde

“बऱ्याच कलाकारांना मोठं केलं, पण मला काम दिलं नाही”, केदार शिंदेंच्या मावशी चारुशीला साबळेंचा खुलासा,

सुप्रसिद्ध अभिनेत्री चारुशीला साबळे यांनी चित्रपटसृष्टीला दिलेलं योगदान मोठं आहे. शाहीर साबळे यांची मुलगी म्हणूनही चारुशीला यांना ओळखलं जातं. शाहीर साबळे यांच्याबरोबर लोकधारा कार्यक्रम उभा करण्यात चारुशीला यांचाही मोठा वाटा आहे. साबळे कुटुंबातील मंडळी आजही कलाक्षेत्रात चांगलाच पाय रोवून उभे आहेत. चारुशीला या त्यापैकीच एक. शिवाय नात्याने त्या दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या मावशी आहेत. केदार यांच्याबरोबर काम करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र केदार यांनी कधीच काम दिलं नसल्याचं चारुशीला यांचं म्हणणं आहे. याचबाबत त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाष्य केलं. (Charusheela sable on kedar shinde)

ITSMAJJAच्या ठाकुर विचारणार या कार्यक्रमात चारुशीला साबळे यांनी हजेरी लावली होती. यावेळी “दिग्दर्शक केदार शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा योग तुला कधीच आला नाही असं का?” असा प्रश्न चारुशीला यांना विचारण्यात आला. तेव्हा चारुशीला म्हणाल्या, “हा प्रश्न मला कित्येक लोक विचारतात. मी नेहमीच यावर उत्तर देणं टाळते. आमच्या घरात एवढा चांगला मुलगा असणं अभिमानाचीच गोष्ट आहे. खरंतर तो माझा विद्यार्थी आहे. केदार जन्माला आला तेव्हा मी १५ वर्षांची होते. महाराष्ट्राची लोकधारा मी केलं तेव्हा मी २५ वर्षांची होते. मी लोकधारा करायला जेव्हा घेतलं तेव्हा केदार १० वर्षांचा होता. लोकधारा करण्यासाठी मी एक एक मुलगा जेव्हा जमवत होते हे सगळं त्याने बघितलं आहे”.

आणखी वाचा – घटस्फोट, लेकीलाही घेऊन गेली, आई-वडिलांचं निधन अन्…; एकटेपणामुळे राहुल देवच्या भावाचा अंत?, शेवटची पोस्ट व्हायरल

“माझ्या सख्ख्या बहिणीचा तो मुलगा आहे. शाहीर साबळेंचा घरातील पहिला नातू. तो खूप लाडका होता. केदारचं बालपण खूप लाडात गेलं आहे. केदार शिंदे चांदीचा चमचा तोंडात घेऊनच जन्माला आला. तो इतक्या उच्च पातळीचा दिग्दर्शक झाला याचा आम्हाला खूप अभिमान आहे. मोहन गोखले आमचा खूप जवळचा मित्र होता. तो त्या काळी गेला. आम्ही तर नेहमी भेटायचो. केदारने बऱ्याच कलाकारांचा उद्धार केला आहे. बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलं आहे. शुभांगी गोखलेला त्याने खूप सुंदर सीरिज दिली. त्यानंतर तिचं करिअर खूप पुढे गेलं. छान अभिनेत्री म्हणून नावारुपाला आली”.

पाहा बेधडक मुलाखत

“एक ते दोन वर्षांनी अजित (पती) गेला. मला वाटलं तो माझाही उद्धार करेल. पण तसं काही घडलं नाही. त्यानंतर एका वर्षाने लक्ष्या (लक्ष्मीकांत बेर्डे) गेला. तोही आमचा खास मित्र होता. त्याने तिथेही ‘जत्रा’ चित्रपटात त्याच्या बायकोला काम दिलं. तिचाही उद्धार केला. सिद्धार्थ जाधव, भरत जाधव किंवा अंकुश जाधव अशा बऱ्याच कलाकारांना त्याने मोठं केलं. हे सगळे कलाकार चांगलं नाव कमावण्यामागे केदारचा मोठा वाटा आहे. आणि ही मुलं इंडस्ट्रीत मोठं होण्यामागे माझा मोठा वाटा आहे. लोकधारामुळे हे घडलं. सुरुवातीचं शिक्षण जे असतं हे त्यांनी माझ्याकडूनच घेतलं आहे. त्याने महिलांशी संदर्भात अनेक चित्रपट केले. तो माझ्याबाबत विचार करु शकला असता”.

आणखी वाचा – सासऱ्यांनी छातीला हात लावला, दीराने प्रायव्हेट जागेवर मारत…; हगवणेंच्या मोठ्या सूनेच्या आईचे पत्राद्वारे गंभीर आरोप, क्रुर कृत्य

“मी त्याला कधी काय विचारलं नाही, त्यानेही मला कधी काय सांगितलं नाही. एकदा योग जुळून आला होता. मात्र ते कामंही त्याने मला दिलं नाही. दुसऱ्या अभिनेत्रीला त्याने ते दिलं. मला वचन देऊनही त्याने ते काम मला दिलं नव्हतं. असं माझ्याच घरातल्या माणसाने केलं आहे. परत काहीतरी नवं करायला मिळणार हा आनंद होता. मात्र तसं झालं नाही. त्याच भरात मी महेश कोठारेला फोन केला. त्याच्याकडील मालिकेमध्ये काम मिळवलं. ती मालिका जवळपास वर्षभर मी केली. भूमिका मला आवडली की नाही हे वेगळं. पण मी अजूनही काम करते हे मला दाखवून द्यायचं होतं. मी मुद्दाम ते काम केलं”. चारुशीला यांनी बेधडकपणे आपलं मत मांडलं.  

Tags: entertainment newskedar shindemarathi actormarathi actress
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Prachi Pisat Has Accused Sudesh Mhashilkar

"तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये", दिग्गज अभिनेत्याने अश्लील मॅसेज केल्याचे प्राची पिसाटचे गंभीर आरोप, बाजू घेणाऱ्यांनाही सुनावलं

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.