शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 11:45 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
 Priya Marathe death news

"न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस", प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, "गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…"

 Priya Marathe death news : अभिनेत्री प्रिया मराठेच्या अकाली निधनाच्या बातमीने संबंध सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला. अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली आणि वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी अभिनेत्रीने या जगाचा निरोप घेतला. प्रियाचे हे अचानक असे निघून जाणे खूप धक्कादायक आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सृष्टीलाही प्रियाच्या जाण्याने धक्का बसला आहे. पवित्र रिश्ता या मालिकेतून प्रियाने हिंदी टेलिव्हिजनवर आपले स्थान निर्माण केलं. या मालिकेत अंकिता लोखंडे मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. तर प्रिया मराठे आणि प्रार्थना बेहेरे या दोन मराठी अभिनेत्रीही झळकल्या. प्रिया, अंकिता, प्रार्थना या तिघींची सेटवर चांगलीच गट्टी होती.

प्रियाला शेवटचे पाहण्यासाठी प्रार्थना बेहेरे उपस्थित होती, यावेळी तिला अश्रूही अनावर झाले. तर अंकिताने प्रियासाठी पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या. अंकिता लोखंडेने दुःख व्यक्त करत लिहिले, “‘पवित्रा रिश्ता’ मालिकेतील प्रिया माझी पहिली मैत्रीण होती. मी, प्रार्थना आणि प्रिया… आम्हा तिघींची एकत्र गैंग होती. आम्ही तिघी नेहमी एकत्र असायचो. खूप मजा करायचो. प्रिया, ग्रॅट्स (प्रार्थना) आणि मी आम्ही तिघी एकमेकींना मराठीत प्रेमाने ‘वेडे’ म्हणायचो. ‘वेडे’ अशीच हाक मारायचो. ती माझ्याबरोबर माझ्या चांगल्या दिवसांमध्ये होती आणि दुःखातही प्रियाने माझी साथ कधीच सोडली नाही. जेव्हा-जेव्हा मला तिची गरज भासली त्या प्रत्येक क्षणाला प्रिया माझ्याबरोबर होती.

आणखी वाचा – पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुक

View this post on Instagram

A post shared by Ankita Lokhande (@lokhandeankita)

पुढे तिने लिहिलं, “गणपती बाप्पाचं आगमन झाल्यावर ती नेहमी गौरीच्या आरतीला माझ्याकडे यायची. तिने आमच्या घरची आरती कधीही चुकवली नव्हती. आता यावर्षी प्रिया मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन. माझी वेडे. खरंच खूप आठवण येतेय तुझी. प्रियाने गेल्या काही वर्षांत खूप धीराने, खंबीरपणे या आजाराचा सामना केला. आज ती आपल्याबरोबर नाही. हे लिहिताना सुद्धा माझं मन भरून येतंय. माणूस आपल्या सुंदर हास्यामागे किती काय-काय सहन करत असतो हे कधीच कोणाला कळू शकत नाही याची जाणीव आता ती सोडून गेल्यावर होत आहे”.

आणखी वाचा – Priya Marathe Death : मोठा धक्का! सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

अंकिता शेवटी लिहिते, “प्रिया… माझी प्रिय वेडे. तू कायम माझ्या हृदयात राहशील, तुझी प्रत्येक आठवण कायम माझ्या मनात असेल. आपण पुन्हा भेटेपर्यंत. ओम शांती”. गौराईच्या आगमनाला अंकिताने प्रियाला खूप मिस केलं.

Tags: ankita lokhande emotionalentertainmentPriya Marathe death news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Aastad Kale On Priya Marathe Death

"कुठून आणलीस गं ही ताकद?", आस्ताद काळेचे प्रिया मराठेसाठी पत्र, भावुक होत म्हणाला, "आजार जडलाय हे समजल्यावर…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.