शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कुठून आणलीस गं ही ताकद?”, आस्ताद काळेचे प्रिया मराठेसाठी पत्र, भावुक होत म्हणाला, “आजार जडलाय हे समजल्यावर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 12:45 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aastad Kale On Priya Marathe Death

"कुठून आणलीस गं ही ताकद?", आस्ताद काळेचे प्रिया मराठेसाठी पत्र, भावुक होत म्हणाला, "आजार जडलाय हे समजल्यावर…"

Aastad Kale On Priya Marathe Death : सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या अकाली निधनाने सिनेसृष्टीला धक्का बसला. प्रियाची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली. वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी तिने जगाचा निरोप घेतला. प्रियाच्या जाण्याने अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली. दरम्यान आता अभिनेता आस्ताद काळेनेही फेसबुकवर भावुक पोस्ट लिहीत भावना व्यक्त केल्या आहेत. आस्तादने प्रियासाठी खास पत्र लिहिलं आणि शंतनूलाही त्याने या पोस्टद्वारे धीर दिला.

आस्तादने पोस्टमध्ये असं म्हटलंय, “शंतनू मित्रा. तुझ्याविषयी आपलेपणा, आपुलकी ही कायमच वाटत आली आहे. आता फार फार आदरही वाटतो आहे. वाटत राहील. तुमच्या लढाईत काही मदत नाही करु शकलो याची मनापासून माफी मागतो रे. पण हे पत्र मी लिहीतोय ते मात्र प्रियाला. जमेल तेव्हा कृपया तिच्यापर्यंत पोहोचवशील? प्रिय प्रिया, तू शूर आहेस. आजही आहेस. कायमच असशील. आपली काही घट्ट मैत्री म्हणावी अशी नाही. पण चांगले संबंध, परस्परांविषयी आदर,आत्मीयता, आणि एकमेकांची यथेच्छ मस्करी आणि अपमान करायचे एकमेकांना दिलेले अधिकार हे सगळं आहे नक्की. पण तुझ्या घट्ट असलेल्या मित्रपरिवारातील काही लोक माझेही निकटवर्तीय असल्यामुळे तुझ्याविषयी सतत कानावर पडत राहायचं”.

आणखी वाचा – पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुक

“तू सुरुवातीच्या काळात घेतलेले कष्ट मी जवळून पाहिले नाहीत, त्यांच्याविषयी ऐकून मात्र आहे. खात्रीलायक लोकांकडून. त्या कष्टांची प्रसिद्धीरूपी आणि आर्थिक फळं उत्तमरित्या मिळूनही तुझा तसूभरही न बदललेला स्वभाव मात्र मीही पाहिला आहे. अवघड असतं गं हे जमणं. भल्याभल्यांना जमत नाही. आजच्या काळात आपल्यासारख्या अस्थिर क्षेत्रात काम करुन मुंबईसारख्या शहरात स्वत:च्या मालकीचं मोठं घर घेणं, ते सजवणं, संसार उभा करणं, हे फार फार अभिमानास्पद आहे. पण हे झालं भौतिक यश”.

“माणूस म्हणून तू जे जे केलं आहेस, त्याला तोड नाही. मस्तीखोर, मनमिळावू, संवेदनशील, थोडीशी ढिश्क्यांव, असे सगळे पैलू तुझ्या वागण्यात मी आजवर बघितले. तुला चिडलेलं पाहिल्याचं मात्र आठवत नाही. वैतागलेली आठवत्येस, पण चिडून कोणाशी बोलताना पाहिल्याचं आठवत नाही. कधी तसं कानावरही आलं नाही. आणखी वाचा – पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुकथोडक्यात सांगायचं तर साधारण २० वर्षं तू या क्षेत्रात काम केलंस, पण कधीच तुझ्याबद्दल कोणाला काहीच वाईट बोलताना ऐकलं नाही. वेडंवाकडं कधीच नाही. हे असं वागता येणं खूप अवघड असतं गं. भल्याभल्यांना जमत नाही. आपल्याला हा नीच आजार जडलाय हे पहिल्यांदा समजल्यावर तूही काही काळ खचली असशील, घाबरली असशील. पण मला दिसली ती कंबर कसून त्या हलकटाशी लढायला उभी राहिलेली तू. एकदा मागे रेटलंस त्याला. पण तो परत आला. येतोच तो. पुन्हा लढाई. पुन्हा यातना”.

आणखी वाचा – “न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस”, प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, “गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…”

“जरी आप्तेष्ट जवळ असले, शंतनूसारखा धीराचा, आदर्श जोडीदार सोबत असला, तरी सर्व काही भोगत असलेलं शरीर तुझंच. मानसिक यातना वाटून घेतल्याच असणार सर्वांनी, पण शारीरिक यातना भोगायला तू एकटीच. आणि संपूर्ण एक वर्षं! कुठून आणलीस गं ही ताकद? की होतीच तुझ्यात? पण ती दिसण्यासाठी हे कारण उद्भवायची गरज नव्हती ना राव! तुझ्या अभिनयाबद्दल मी काही बोलणार नाही. त्याच्या पावत्या प्रेक्षकांनी तुला भरभरुन दिल्या आहेत. माणूस, मित्र म्हणून मात्र तुझे आभार मानतो प्रिया. खूप शिकवलंस. ताकद दाखवलीस. हसवलंस तेवढंच लक्षात ठेवायचंय. हसवलंस. THANK YOU प्रिया”.

Tags: aastad kalepriya marathepriya marathe death
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Abhijeet Khandkekar On Priya Marathe

"तू अजून हवी होतीस…", मालिकेत एकत्र काम करतानाच्या प्रियाबरोबरच्या आठवणी शेअर करत अभिजीत भावुक, म्हणाला, "खोटे दिलासे शेवटी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.