priya marathe passed away : मराठी कलाविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठे हिचे वयाच्या ३८व्या वर्षी निधन झाले आहे. अभिनेत्रीची कर्करोगाशी झुंज सुरु होती. अखेर या आजाराशी सुरु असलेल्या लढाईत तिला अपयश आले. अचानक निधनाच्या समोर आलेल्या बातमीने साऱ्यांना खूप मोठा धक्का बसला आहे. संबंध चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. संध्याकाळी चार वाजता तिच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार असल्याचं सूत्रांकडून समोर आलं आहे. सकाळी चारच्या सुमारास अभिनेत्रीचे मीरा रोड येथे निधन झाले.
अनेक मराठी मालिका, चित्रपट यांमधून महत्त्वपूर्ण भूमिका साकारत प्रिया मराठेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. अभिनेत्री शेवटची तुझेच मी गीत आहे या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. या मालिकेतूनही प्रियाने अर्ध्यावरच एक्झिट घेतली. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असायची. मात्र काही दिवसांपासून ती सोशल मीडिया आणि सिनेविश्वापासून दूर असलेली दिसली. कारण अभिनेत्री कॅन्सरशी झुंज होती. प्रियाने आजवर अनेक खलनायकी भूमिकेत काम केलं आहे.
आणखी वाचा – अल्लू अर्जुनच्या कुटुंबियांवर कोसळला दुःखाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचे निधन, अभिनेता मुंबईहून तातडीने रवाना
प्रियाने ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘संभाजी’ ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते है’ या हिंदी मालिकांमुळे तिचा हिंदी कलाविश्वात ही दबदबा निर्माण झाला होता.





