रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 2, 2025 | 10:43 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Ankita Walawalkar Gauri Puja

पारंपरिक लूक, डोक्यावर सूप अन्…; अंकिता वालावलकरने सासरी भरला लग्नानंतरचा पहिला वौसा, सासूने दाखविली प्रथा, सूनेचं कौतुक

Ankita Walawalkar Gauri Puja : महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच गौराईच्या आगमनानेही सर्वत्र मंगलमय वातावरण झालेलं पाहायला मिळत आहे. गौरी पूजन, गौरी आवाहन यासाठी समस्त महिलावर्ग नेहमीच तत्पर असतो. महाराष्ट्रातील प्रत्येक भागात गौरी पूजनाची पद्धत वेगवेगळी असल्याचं पाहायला मिळतं. कोकणात तर गणेशोत्सव आणि गौरीपूजन याची वेगळीच धामधूम पाहायला मिळते. गौरी पूजनावेळी वौसा ही प्रथा असून कोकणात तर मोठ्या उत्साहात ही पद्धत वापरली जाते. काल गौरी पूजनावेळी साऱ्यांनी वौसा भरत परंपरा जपली. नववधूंसाठी यंदाचा हा वौसा पहिलाच असल्याचं पाहायला मिळालं.

अशातच सर्वांची लाडकी कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकरनेही यंदा गौरी पूजनावेळी वौसा भरला. याचा सुंदर असा व्हिडीओ तिने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. अंकिताने लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव साजरा केला. आधी ती माहेरच्या बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करुन तिच्या सासरच्या घरी म्हणजेच अलिबागला पोहोचली. अंकिताचा लग्नानंतरचा पहिला वौसा अगदी थाटामाटात साजरा केला असल्याचं पाहायला मिळालं.

आणखी वाचा – Priya Marathe Death : मोठा धक्का! सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन, मराठी कलाविश्वावर शोककळा

View this post on Instagram

A post shared by Ankita PrabhuWalawalkar (@kokanheartedgirl)

सासरच्या घरी साऱ्यांनीच अंकिताच्या पहिल्या वौसाला भरभरून दाद दिली. अंकिताचा नवरा कुणाल व तिची सासू देखील उपस्थित होती. पहिलाच वौसा असल्याने अंकिताला पाच सूप डोक्यावर घेऊन गौरी पूजनाला जावे लागले. यावेळी तिला सर्व प्रथा, परंपरा शिकवायला तिची सासू सोबत होती. कोकणातील परंपरेनुसार अंकिताने गौरीपूजन करत वौसा भरला, आणि याचा सुंदर असा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला. गौरीपूजनासाठी अंकिताने खास पारंपरिक साडी नेसली होती.

आणखी वाचा – Priya Marathe Death : प्रिया मराठेच्या निधनाने हादरले मराठी कलाकार, शेवटचं पाहताना सगळेच ढसाढसा रडू लागले अन्…

अंकिताच्या या व्हिडीओवर शुभेच्छांचा वर्षाव होताना पाहायला मिळत आहे. “माझं पहिलं गौरी पूजन. खूप खास क्षण… लग्नानंतरचा पहिला सण, नवीन घरातलं पहिलं पूजन, आणि सगळ्यांच्या आशीर्वादातली सुंदर आठवण”, असं कॅप्शन देत तिने हा सुंदर असा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भरभरुन कमेंट्स करत अंकिताच्या लूकच कौतुक केलं आहे.

Tags: ankita walawalkarganeshotsavgauri pujan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
 Priya Marathe death news

"न चुकता गौरीच्या आरतीला यायचीस", प्रिया मराठेच्या निधनानंतर अंकिता लोखंडे भावुक, म्हणाली, "गेल्या काहीवर्षात आजाराचा सामना केलास पण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.