शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कोकणातल्या गावी रमल्या ऐश्वर्या नारकर, चुलीवर काम करण्याचा अभिनेत्रीचा आनंद, साधेपणाचं कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 23, 2024 | 5:24 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Actress Aishwarya Narkar shared video from Kokan after Satvya Mulichi Satavi Mulgi serial over

मालिकेचे शूटिंग संपताच ऐश्वर्या नारकर पोहोचल्या कोकणात, खास व्हिडीओ केला शेअर

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं. ऐश्वर्या यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून ऐश्वर्या घराघरांत पोहोचल्या. या मालिकेत त्यांकी भूमिका नकारात्मक असली तरी त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. मात्र नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता ऐश्वर्या त्यांच्या गावी गेल्या आहेत. (Aishwarya Narkar Kokan Video)

ऐश्वर्या नारकर या सोसल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओलं चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून त्या कोकणात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या चुलीसमोर बसल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर  त्यांनी ‘कोकण व्हाइब्ज’ (Kokan Vibes) असे लिहून त्यासमोर हार्ट इमोजी शेअर केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘फील’ असं लिहिलं आहे. त्यामुळे रोजच्या कामाच्या धकाधकीमधून निवांत वेळ काढत त्या कोकणात त्यांचा निवांत वेळ एन्जॉय करत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. खूप छान, लय भारी, साधपेणा जपणाऱ्या अभिनेत्री अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

आणखी वाचा – Paataal Lok Season 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जयदीप अहलावतच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष

दरम्यान, ‘घे भरारी’, ‘तूच माझी भाग्यलक्ष्मी’, ‘सत्ताधीश’, ‘घर गृहस्थी’, ‘साक्षात्कार’, ‘रणरागिनी’, ‘ओळख’, ‘सून लाडकी सासरची’, ‘एक काळोखी रात्र’ ते ‘येलो’, ‘बाबांची शाळा’, ‘धडक’ या आणि अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करत ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्यांची ही मालिका संपल्यानंतर आता त्या कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची सर्वजबण वाट पाहत आहेत.      

Tags: Aishwarya Narkar Kokan Videomarathi actressSatvya Mulichi Satavi Mulgi fame Aishwarya Narkar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
rahul vaidya on virat kohli

राहुल वैद्यला विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर केलं ब्लॉक, कारण विचारताच गायक म्हणाला, “मलाच कळलं नाही की…”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.