मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत एका अभिनेत्रीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं. ऐश्वर्या यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही लाखो चाहते आहेत. ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेतून ऐश्वर्या घराघरांत पोहोचल्या. या मालिकेत त्यांकी भूमिका नकारात्मक असली तरी त्यांची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. मात्र नुकताच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. त्यानंतर आता ऐश्वर्या त्यांच्या गावी गेल्या आहेत. (Aishwarya Narkar Kokan Video)
ऐश्वर्या नारकर या सोसल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतात. सोशल मीडियावर ते आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या या फोटो व व्हिडीओलं चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. अशातच त्यांनी नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून त्या कोकणात असल्याचे पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओमध्ये त्या चुलीसमोर बसल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडीओवर त्यांनी ‘कोकण व्हाइब्ज’ (Kokan Vibes) असे लिहून त्यासमोर हार्ट इमोजी शेअर केला आहे.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
तसंच या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी ‘फील’ असं लिहिलं आहे. त्यामुळे रोजच्या कामाच्या धकाधकीमधून निवांत वेळ काढत त्या कोकणात त्यांचा निवांत वेळ एन्जॉय करत असल्याचे या व्हिडीओमधून दिसत आहे. त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही लाईक्स व कमेंट्स करत व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. खूप छान, लय भारी, साधपेणा जपणाऱ्या अभिनेत्री अशा अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Paataal Lok Season 2 ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला, जयदीप अहलावतच्या नव्या पोस्टरने वेधलं लक्ष
दरम्यान, ‘घे भरारी’, ‘तूच माझी भाग्यलक्ष्मी’, ‘सत्ताधीश’, ‘घर गृहस्थी’, ‘साक्षात्कार’, ‘रणरागिनी’, ‘ओळख’, ‘सून लाडकी सासरची’, ‘एक काळोखी रात्र’ ते ‘येलो’, ‘बाबांची शाळा’, ‘धडक’ या आणि अशा अनेक मराठीसह हिंदी चित्रपटांत काम करत ऐश्वर्या यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. अशातच आता त्यांची ही मालिका संपल्यानंतर आता त्या कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याची सर्वजबण वाट पाहत आहेत.