बॉलिवूड गायक राहुल वैद्य साध्या चर्चेत आला आहे. ‘इंडियन आयडल’ या कार्यक्रमातून तो प्रकाशझोतात आला. त्याच्या जादुई आवजाने सगळ्यांनाच आपलंसं केलं. काही महिन्यांपूर्वी श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा लाडका धाकटा लेक अनंत अंबानी यांच्या लग्न सोहळ्यात राहुलने गायलेली गाणी अधिक पसंत केली गेली. त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत आलेले दिसून आले. दोन वर्षांपूर्वी तो अभिनेत्री दिशा परमारबरोबर लग्नबंधनात अडकला. दोघांनाही एक मुलगी असून तो मुलीबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसतात. मात्र आता राहुल एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. (rahul vaidya on virat kohli)
सोशल मीडियावर राहुलचा एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. राहुलला प्रसिद्ध क्रिकेटपटू विराट कोहलीने ब्लॉक केल्याचे सांगितले आहे. या सगळ्या प्रकारामुळे राहुलने गोंधळात असल्याचेदेखील सांगितले. विराटने राहुलला ब्लॉक केल्याचे नक्की कारण काय? हे मात्र अद्याप त्याला समजले नसल्याचेही तो म्हणाला आहे. राहुलने नुकताच फोटोग्राफर्सबरोबर संवाद साधला. यावेळी एका फोटोग्राफरने राहुलला विराटने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याबद्दल विचारले. त्यावर तो म्हणाला की, “मला आजपर्यंत समजलं नाही की विराटने मला का ब्लॉक केले आहे ते. ऑनलाइन कनेक्शन बंद करावं असं का वाटलं असेल असाही मला विचार पडला आहे”. दरम्यान राहुलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे
राहुलचा हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी म्हणाला की, “विराट कोहली याला ओळखतो तरी का?”, दूसरा एक नेटकरी म्हणाला की, “हरकत नाही भाऊ, रडू नकोस”. अजून एक नेटकरी म्हणाला की, “भावा टेंशन नको घेऊस. तोपण फक्त जाहिरातीच पोस्ट करतो”. तसेच अनेकांनी हा प्रसिद्धीसाठी असं करत असल्याचे म्हणाले आहेत.
या सगळ्या प्रकरणावर विराट काय प्रतिक्रिया देणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. राहुलच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर तो दिशाबरोबर २०२१ साली लग्नबंधनात अडकला. २० सप्टेंबर २०२३ साली एका गोंडस मुलीला जन्म दिला. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात.