२०२० मध्ये आलेली ‘पाताल लोक’ ही वेब सीरिज खूप लोकप्रिय ठरली होती. या सीरिजने अनेक प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अभिनेता जयदीप अहलावतची मुख्य भूमिका असलेल्या या सीरिजने प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं होतं. तेव्हापासूनच या सीरिजच्या पुढच्या सीझनची प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली होती. अनेकजण या सीरिजच्या आगामी सीझनची वाट पाहत होते. अशातच काही दिवसांपूर्वी पाताल लोक सीझन २ची घोषणा करण्यात आली. प्राइम व्हिडीओ या ओटीटी माध्यमाच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे या सीरिजच्या आगामी भागाबद्दल अपडेट देण्यात आली होती. (Paataal Lok Season 2 release date)
त्यानंतर आता या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीखही समोर आली आहे. सोशल मीडियावर पाताल लोक या सीरिजच्या दुसऱ्या भागाचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे आणि या पोस्टरवर जयदीप अहलावतचा चेहरा दाखवण्यात आला होता. पण यावर तारीख जाहीर करण्यात आली नव्हती. आता या सीरिजचे आणखी एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे, ज्यातून या सीरिजच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. ‘पाताल लोक सीझन २ येत्या १७ जानेवारी २०२५ रोजी प्राइम व्हिडीओवर पाहता येणार आहे.
आणखी वाचा – “गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता”, सुप्रसिद्ध गायकाचे वादग्रस्त वक्तव्य, म्हणाला, “ते चुकून…”
‘पाताल लोक’च्या दुसऱ्या सीझनमधील कलाकार अजून गुप्त ठेवण्यात आले आहेत. पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत (इन्स्पेक्टर हातीराम चौधरी) आणि इश्वाक सिंग (कॉन्स्टेबल अन्सारी) यांच्या भूमिका होत्या. ‘झीझेस्ट’च्या अहवालानुसार, दुसऱ्या सीझनमध्ये जहानू बरुआ, तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर, गुल पनाग आणि अनुराग अरोरा हे कलाकार असल्याचं म्हटलं जात आहे.
आणखी वाचा – शिवानी सोनारची लगीनघाई सुरु, घरच्यांनी केलं साग्रसंगीत केळवण, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, ‘पाताळ लोक’चा पहिलं सीझन २०२० मध्ये कोविडच्या काळात आला होता आणि या सीरिजच्या दमदार कथेने सगळ्यांनाच वेड लावलं. या सीरिजची कथा तरुण तेजपाल यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय असॅसिन्स’ या पुस्तकावर आधारित होती. त्यामुळे आता ‘पाताळ लोक’च्या सीझन २ मध्ये प्रेक्षकांना आणखी नवीन काय पाहायला मिळणार आहे? सीरिजची नेमकी कथा काय आहे? हे जाणून घेणं उत्सुकतेचं ठरणार आहे.