प्रत्येक जण आयुष्य व्यथित करण्यासाठी आपल्या हक्काचा साथीदार शोधत असतो. प्राईसद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी सुद्दा वयाच्या ६० व्या वर्षी आपला साथीदार निवडला असल्याची बातमी आणि फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होता दिसतायत.(Ashish Vidyarthi Rupali Barua)
आसाम येथील फॅशन डिझायनर रुपाली बुरुवा यांच्या सोबत आशिष यांनी दुसरं लग्न केलं. कोलकाता येथे रुपाली आणि आशिष यांचा लग्न सोहळा पार पडला. सहकुटुंबाच्या उपस्थतीत त्यांनी कोर्ट मॅरेज केलं आणि सायंकाळी त्यांचा रिसेप्शन सोहळा देखील ठेवण्यात आला.

इटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आशिष यांनी सांगितलं कि या वयात रुपाली सोबत लग्न करण्यात एक वेगळा आनंद आहे. ती मेहनती आहे, प्रेमळ आहे. मला माझे उर्वरित आयुष्य आनंदात व्यतीत करायचे आहे आणि रुपालीला ही यात काही हरकत नाही त्यामुळे आम्ही दोघांनी लग्न करून एकत्र राहण्याचा निर्णय घेतला.
कलाकारांनी दुसरं लग्न करणं ही काय नवीन गोष्ट नाही. मग वय किती हि असो. अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी आता पर्यंत जवळपास २०० चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बहुतांश चित्रपटात त्यांनी साकारलेली नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आणि आज ही त्या भूमिकांसाठी ते ओळखले जातात. आशिष यांची पत्नी रुपाली या पेशाने फॅशन डिझायनर असून कोलकाता येथे त्याच स्वतःच स्टोअर देखील आहे.(Ashish Vidyarthi Rupali Barua)