शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

वीर पहारियाची खिल्ली उडवण्यावरुन कॉमेडियन प्रणित मोरेला मारहाण, अभिनेत्याचं पहिल्यांदा भाष्य, म्हणाला, “माफी मागतो आणि…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 5, 2025 | 4:03 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Veer Paharia on Pranit More attack

प्रणित मोरेवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अभिनेता वीर पहारियाने दिली प्रतिक्रिया

सोशल मीडिया, युट्युबवर सक्रिय असणाऱ्या आणि तरुण वर्गातील लोकांना प्रणित मोरे ही नाव ओळखीचेच असेल. स्टँड-अप कॉमेडियन म्हणून त्याला संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. आपल्या अनोख्या शैलीतून विनोदाचं अचूक टायमिंग पकडत प्रणितने स्वतःचा चाहता वर्ग निर्माण केला आहे. त्याच्या स्टँड-अप कॉमेडीच्या शोला चाहत्यांची चांगलीच गर्दी होते. सोशल मीडियावर त्याचे नाव कायमच चर्चेत राहत असतं. अशातच त्याच्यावर हल्ला झाल्याचे वृत्त समोर आले. सोलापूर येथे स्टँड-अप कॉमेडीचा शो संपल्यावर मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ११ ते १२ जणांच्या जमावाने मिळून त्याच्यावर हल्ला केला. याबद्दल त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. (Veer Paharia on Pranit More attack)

अभिनेता वीर पहारियावर केलेल्या विनोदामुळे प्रणित मोरेला सोलापूरमध्ये ११-१२ लोकांच्या गटाने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अभिनेता वीर पहारियावर केलेल्या विनोदामुळे आपल्याला मारहाण झाल्याचे स्टँडअप कॉमेडीयन प्रणित मोरेने म्हटलं आहे. वीर हा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. प्रणितवरील हल्ल्यासंदर्भात आता वीरने नुकतीच प्रतिक्रिया दिली आहे. वीर पहारियाने स्वत: पोस्ट शेअर करत “या घटनेशी काहीही संबंध नसून, या हल्लाचा मी तीव्र निषेध करतो” असं म्हटलं आहे.

आणखी वाचा – ‘हेरा फेरी ३’मध्ये तब्बूही दिसणार? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण, म्हणाली, “माझ्याशिवाय…”

वीरने त्याच्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, “कॉमेडियन प्रणित मोरेबरोबर जे काही घडलं, ते वाचून मला खरंच धक्का बसला आहे. सर्वात आधी मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे ती म्हणजे, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. कोणत्याही प्रकारच्या हिंसेचा मी तीव्र निषेध करतो. ट्रोलिंगला मी कधीच मनावर घेत नाही. उलट मी हसतो आणि माझ्या टीकाकारांशीसुद्धा नेहमीच प्रेमाने वागतो. कधीही कोणाचं वैयक्तिक नुकसान करण्यास मी प्रोत्साहन देणार नाही किंवा याचं समर्थनदेखील करणार नाही”.

आणखी वाचा – ज्येष्ठ अभिनेत्री पुष्पलता यांचे निधन, वयाच्या ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, कलाकारही हळहळले

पुढे वीर असं म्हणाला की, “माझ्यासारख्या सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्या सहकलाकारावर झालेल्या हल्ल्याचं तर मी अजिबातच समर्थन करणार नाही. प्रणित आणि त्याच्या चाहत्यांना मी एकच सांगेन, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही. तरीही याबद्दल मी तुमची माफी मागतो. कारण, कोणतीही व्यक्ती हे पात्र करत नाही. या हल्ल्यासाठी जे कोणी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी यासाठी मी स्वत: लक्ष घालेन. पुन्हा एकदा मनापासून माफी मागतो”.

Tags: Actor Veer PahariaPranit More attackVeer Paharia on Pranit More attack
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Who Is Hina Khan Husband
Entertainment

हिना खानचा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?, अभिनेत्रीला कॅन्सर झाला तेव्हा घेत होता काळजी, कमाई आहे तब्बल…

जून 6, 2025 | 4:00 pm
Next Post
Avinash Narkar cried his own wedding,

"तिची पाठवणी आणि मीही रडलो", अविनाश नारकरांनी सांगितला त्यांच्या लग्नातील किस्सा, म्हणाले, "विधी, पाठवणी, रडणं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.