गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली बहुप्रतीक्षित ‘ताली’ ही वेबसीरिज नुकतीच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली. तृतीयपंथी समाजाच्या न्यायासाठी लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर ही वेबसीरिज आधारित आहे. ज्यामध्ये अभिनेत्री सुश्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरिज प्रदर्शित झाल्यानंतर या सीरिजबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सुबोध भावेने एक पोस्ट शेअर करत या वेबसीरिजचे कौतुक केले आहे. (Subodh Bhave on taali web series)
अभिनेता सुबोध भावे सोशल मीडियावर सक्रिय असून तो आपल्या फोटोज व व्हिडिओजद्वारे चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर या वेबसीरिजचा पोस्टर शेअर करत एक पोस्ट लिहिली. ज्यात त्याने या सीरिजमधील कलाकार व लेखक-दिग्दर्शकाचे कौतुक केले आहे. तसेच पोस्टमध्ये गौरी सावंत यांच्याबद्दलची एक आठवण चाहत्यांसोबत शेअर केली.
सुबोध भावे आपल्या पोस्टमध्ये म्हणतो, “श्री गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारीत ‘ताली’ ही अप्रतिम वेब मालिका नुकतीच जिओ सिनेमावर पाहिली. मला ‘बस बाई बस’ कार्यक्रमाच्या निमित्ताने श्री गौरी यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. क्षितिज पटवर्धन मित्रा, त्यांचे संपूर्ण आयुष्य तू ज्या पद्धतीने तुझ्या लेखणीतून उतरवलं आहेस त्याला तोड नाही. खूप खूप कौतुक तुझे.”
हे देखील वाचा – “टाळी जेव्हा जोरात वाजते तेव्हा…”, ‘ताली’ वेबसीरिज पाहिल्यानंतर पहिल्यांदाच बोलल्या गौरी सावंत, म्हणाल्या, “तृतीयपंथीयांच्या पालकांना…”
“हेमांगी कवी, ऐश्वर्या नारकर, सुव्रत जोशी, नंदू माधव, शीतल काळे तुम्ही तुमच्या भूमिका किती सुंदर साकारल्या आहेत. कार्तिक निशानदार व अर्जुन बरन अशी निर्मिती करायला धाडस लागतं, अप्रतिम. ही मालिका सादर केल्याबद्दल जिओ सिनेमाचे मनापासून धन्यवाद. रवी जाधव देवा, तुझ्या प्रत्येक कलाकृती मध्ये तुझा खास असा ठसा असतो. या कलाकृतींमध्ये तो कायमचा आमच्या मनावर कोरला गेलंय. कृतिका देव, तुझा गणेश-गौरी ही व्यक्तिरेखा उभी राहण्यात खूप मोठा वाटा आहे आणि सुश्मिता सेन तुम्ही त्या झाला होता. श्री गौरी सावंत तुम्हाला मनापासून वंदन करतो.”, असं सुबोध भावे आपल्या पोस्टमध्ये म्हणाला. (Subodh Bhave on taali web series)
हे देखील वाचा – “बायका मला ढकलून…”, मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्याची जुई गडकरीला भीती, म्हणाली, “आता मला…”
सुबोधच्या या पोस्टवर या सीरिजमधील कलाकार व लेखक-दिग्दर्शकाचे आभार मानले आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या वेबसीरिजचे लेखन क्षितिज पटवर्धन यांनी केले आहे. ही वेबसीरीज जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.