शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कचरा प्रकरणी पुन्हा एकदा भडकला शशांक केतकर, व्हिडीओद्वारे दाखवली सत्य परिस्थिती, म्हणाला, “इतका निर्लज्जपणा…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 20, 2024 | 2:23 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
शशांक केतकरने मालाडमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

शशांक केतकरने मालाडमधील कचऱ्याचा व्हिडीओ शेअर करत आपला राग व्यक्त केला आहे.

‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे शशांक केतकर. शशांक केतकर हा अभिनयाशिवाय सोशल मीडियावरील त्याच्या अनेक सामाजिक विषयांवरील व्हिडीओमुळेही चर्चेत राहत असतो. याआधी त्याने अनेकदा रस्त्यावरील कचऱ्याबाबत व्हिडीओ केले असून त्याच्या या व्हिडीओमुळे प्रशासनाने दखल घेत त्या ठिकाणचा कचरा उचलला असल्याचे पाहायला मिळाले आहे. अशातच शशांकने नुकताच त्याच्या इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओद्वारे त्याने सरकार आणि स्थानिक यंत्रणेला थेट सवालही उपस्थित केला आहे. मुंबईतील मालाड पश्चिमधील एके ठिकाणचा व्हिडीओ शेअर करत त्याने याबद्दलची तक्रार महानगरपालिकेकडे केली आहे. (Shashank Ketkar Angry On Malad Garbage)

शशांकने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये असं म्हटलं आहे की, “काय करायचं? मी रोज सकाळी घोडबंदर रोडवरुन दीड ते पावणे दोन तास गाडी चालवत येतो आणि जातो. घोडबंदर रोडची अवस्था इतकी घाण आहे की काही विचारू नका आणि आता तो रस्ता बरा की काय इतकी वाईट अवस्था आहे मढ आयलँडच्या रस्त्यांची. या ठिकाणी किमान ५० तरी शूटिंग सुरू असतील. इतका महसूल निर्माण करणारा हा भाग आहे. पण या भागातील गावकऱ्यांची गैरसोय बघण्यासारखी आहे”. यापुढे शशांकने मालाडमधील मालवणी पोलिस स्टेशन व मालाड चर्चच्या मधील कचरापेटीचा फोटो दाखवला आहे. यापुढे तो असं म्हणाला आहे की, “या फोटोत दिसणारी कचऱ्याची अवस्था सकाळी नीट असून त्या परिसरातील वस्तीमुळे तिथले दोन-तीन कंटेनर भरुन कचरा बाहेर पडतो आणि तेव्हाची अवस्था अतिशय वाईट असते”.

View this post on Instagram

A post shared by Shashank Ketkar (@shashankketkar)

यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, “तर मला गंमत याचीच वाटते की आता नेमकी आचारसंहीता आहे. त्यामुळे कुणाबद्दल वाईट बोलायच नाही. पण मी आताच हा व्हिडीओ मुद्दाम पोस्ट करत आहे. कारण एखादी गोष्ट जेव्हा अधिकृत होते तेव्हा त्याकडे अधिक लक्ष द्यावं लागतं आणि मी बोलत आहे ते राज्यमातेबद्दल म्हणजेच गोमातेबद्दल. गायीला आपण राज्यमातेचा दर्जा दिला आहे. ती या कचऱ्याच्या आजूबाजूला बसून आपलं पोट भरते आहे. ही आत्ताची अवस्था नाही, कारण मी या परिसरात राहत नाही. मी तिथून दीड-दोन तास लांब ठाण्याला राहतो. पण मी तिथे राहत नसलो तरी मी या देशात राहतो. त्यामुळे या परिसराची मला काळजी वाटते. मला तिथल्या लोकांचीही काळजी वाटते. इतक्या अस्वच्छ घाणेरड्या परिसरात सगळी मंडळी दुर्दैवाने राहत आहेत. ज्या राज्यमातेला नमस्कार करून सगळे राज्यकर्ते मत मागणार आहेत आणि ज्यांच्याकडे मत मागणार आहेत, ते कोणत्या अवस्थेत राहत आहेत हे बघा”.

आणखी वाचा – “मावशी नाही तर आईच झाले”, बहीणीला मुलगी झाल्यानंतर तितीक्षाने व्यक्त केला आनंद, म्हणाली, “भाचीने काही मागितलं तर…”

यापुढे शशांकने असं म्हटलं आहे की, “मी माझ्याकडून प्रामाणिक प्रयत्न करत असून अशा परिस्थितीबद्दल भाष्य करत आहे. माझ्यातील आशा अजूनही जीवंत आहे. त्यामुळे मी महानगरपालिकेच्या नजरेस आणून देत आहे आणि मी हा कचरा साफ होईपर्यंत माझ्या इन्स्टाग्रामवर याचे फोटो पोस्ट करेन. यानंतर माझ्याच इंडस्ट्रीतली लोक आणि काही प्रेक्षक मला टोमणे मारतील. किंवा नाव ठेवतील. तुला काय करायचं आहे, कचरा असूदेत, खड्डे असूदेत, माणसं मरुदेत. तुला काय करायचं आहे असं म्हणतील. पण आपल्याला पोलिस, देव आणि सरकारच्या भीतीमधून बाहेर पडलं पाहिजे. अनेकजण मला पाठींबाही देतील पण भीतीपोटी कुणीही खुलेआम याबद्दल बोलणार नाही. पण मला हे करायचं आहे, कारण ही माझी जबाबदारी आहे”.   

आणखी वाचा – Video : “इतका दिखावा करण्याची काय गरज?”, मजुरांबरोबर रस्त्यावर झोपताच सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता ट्रोल, व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, “सरकार कोणतेही असो… आपली आणि आपल्या देशाची अवस्था कधी सुधारणार? ही जबाबदारी नेमकी कोणाची? इतका निर्लज्जपणा येतो कुठून? सरकार बदललं की सगळं बदलेल वगैरे फालतू पर्याय सुचवू नका. गेली अनेक वर्ष आपला देश अस्वच्छ देशांच्या यादीत अग्रेसरच आहे. त्यामुळे या आधीच्या अनेक सरकारांनीसुद्धा काही आपल्याकडे, या प्रश्नाकडे, सपशेल दुर्लक्षच केलं आहे. काहीतरी कायमस्वरूपी उपाय हवा आहे देशाला माझा हा राग, संताप… हा या अवस्थेबद्दल आहे… कोणा एका व्यक्ती किंवा पक्षाबद्दल नाही”.  

Tags: marathi actorshashank ketkarShashank Ketkar On Malad Garbage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg Boss fame Prince Narula and Yuvika Chaudhary become mother and father welcome baby girl

मुलगी झाली हो! ‘बिग बॉस’ फेम युविका व प्रिन्स यांच्या घरी चिमुकलीचे आगमन, लग्नाच्या सहा वर्षांनी झाले आई-बाबा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.