Prince Narula and Yuvika Chaudhary : टेलिव्हिजन विश्वातील सर्वात आवडते जोडपे प्रिन्स नरुला व त्याची पत्नी युविका चौधरी यांनी काही दिवसांपूर्वी चाहत्यांबरोबर एक आनंदाची बातमी शेअर केली होती. लग्नाच्या ६ वर्षानंतर प्रिन्स व युविका यांनी आई-बाबा होणार असल्याची खुशखबर सांगितली होती. प्रिन्सने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून ही आनंदाची बातमी दिली होती. त्यांतर कार्यक्रम ७ ऑगस्ट २०२४ रोजी युविकाच्या डोहाळ जेवणाचा कार्यक्रम संपन्न झाला. अशातच युविका व प्रिन्स यांच्या घरी एका चिमूकलीचे आगमन झाले आहे. (Prince Narula and Yuvika Chaudhary Girl)
युविकाने (१९ ओक्टोबर, शनिवार) रोजी लहान मुलीला जन्म दिला. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रिन्सचे वडील जोगिंदर नरुला यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. यावेळी त्यांनी “होय, आमच्या घरी मुलीचा जन्म झाला आहे आणि आम्ही खूप आनंदी आहोत” अशी प्रतिक्रिया दिली आहे. लग्नानंतर सहा वर्षांनी त्यांनी एका मुलीला जन्म दिला असून या चिमुकलीच्या आगमनामुळे त्यांच्या घरी सध्या आनंदाचे वातावरण आहे. अनेक चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छा व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
युविका चौधरी व प्रिन्स नरुला यांच्या लव्हस्टोरीची खूप चर्चा झाली होती. हे जोडपे ‘बिग बॉस ९’ मध्ये भेटले होते. येथूनच त्यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेम निर्माण झाले. या जोडप्याने २०१६ मध्ये साखरपुडा केला होता. यानंतर त्यांनी दोन वर्षांनी २०१८ मध्ये लग्न केले. मोठ्या थाटामाटात त्यांचे लग्न पार पडले आणि त्याची बरीच चर्चा झाली. गरोदरपणाची बातमी देताना या दोघांनी “आम्ही ही नवीन जबाबदारी घेण्यास तयार आहोत आणि हा सुंदर टप्पा अनुभवण्यासाठी खूप उत्सुक आहोत” असं म्हटलं होतं.
दरम्यान, ‘बिग बॉस ९’पासून युविका व प्रिन्स यांच्या प्रेमाची सुरुवात झाली. प्रिन्स युविकापेक्षा सात वर्षांनी लहान आहे. युविका ४० वर्षांची असून प्रिन्स ३३ वर्षांचा आहे. ‘बिग बॉस’मध्ये प्रेमात पडल्यानंतर काही वर्षे त्यांनी एकमेकांना डेट केले आणि मग २०१८ साली दोघांनी लग्न केलं. अशातच लग्नाच्या सहा वर्षांनी या दोघांनी मुलीला जन्म दिला आहे.