शुक्रवार, जून 6, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

Saurabh Moreby Saurabh More
जानेवारी 23, 2024 | 2:50 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
Actor Sharad Ponkshe shared viral video of Guru Govind Giri Maharaj on Chhatrapati Shivaji Maharaj see the details

अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

२२ जानेवारी म्हणजेच काल अवघ्या देशभरात रामलल्ला प्राण प्रतिष्ठापणा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. रामजन्मभूमी अयोध्येसह अवघा देश काल भक्तीमय वातावरणात रामलल्लाच्या प्रतिष्ठापणा सोहळा याची देही याची डोळा अनुभवत होता. भगवान श्रीराम यांच्या मूर्तीची पहिली झलक पाहिल्यानंतर अनेकांनी कृतकृत्य झाल्याचे म्हटले. ‘याची देही याची डोळा, ऐसा देखिला सोहळा’ अशा भावना रामभक्तांनी व्यक्त केल्याचे पाहायला मिळाले.

प्राण प्रतिष्ठापणा सोहळा पार पडताच प्रभू रामाच्या मूर्तीचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशातच एका व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. कालच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्यात गोविंद देवगिरी महाराज यांनी “मला या परंपरेला बघून केवळ एका राजाची आठवण येते आहे, त्या राजामध्ये हे सर्व गुण होते, त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज.” असं म्हटलं. तसेच समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचेदेखील त्यांनी म्हटले.

View this post on Instagram

A post shared by Sharad Ponkshe (@sharadponkshe)

हेही वाचा – Video : लग्नाला एक महिना पूर्ण होताच मुग्धा वैशंपायनने शेअर केला Unseen व्हिडीओ, पहिल्यांदाच दाखवला कसा पार पडला विवाह, चाहत्यांकडूनही कौतुकाचा वर्षाव

गोविंद देवगिरी महाराज यांचा छत्रपती शिवाजी महाराजांवरील हा व्हायरल व्हिडीओ अभिनेते शरद पोंक्षे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच समर्थ रामदास स्वामी हेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचा – “मुलांच्या तोंडून स्वामीच बोलतात अन्…”, क्रांती रेडकरच्या लेकींनाही आहे स्वामी समर्थांचं वेड, अभिनेत्री म्हणाली, “छबील खेळत असताना…”

दरम्यान, काही दिवसांपूर्वी शरद पोंक्षे यांनी समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असल्याचे म्हटले होते. शरद पोंक्षे यांनी एका कार्यक्रमात “एक लंगोट नेसलेला आणि दाढी वाढलेला संन्याशी खडकावर राजासारखा बसला आहे. तसेच बाजूला छत्रपती उभे आहेत. ते छत्रपती आहेत. छत्रपतीपदावर बसलेले आहे. राज्याभिषेक झालेला आहे. स्वराज्याची निर्मिती झालेली आहे. राजा म्हणून राज्याभिषेक देशाने मान्य केलेला आहे. ते विनम्रपणे, शांतपणे बाजूला उभे आहे” असे म्हणाले होते आणि यावरुन मोठा वाद झाला होता. त्यांच्यावर सोशल मीडियासह अनेक स्तरातून टीका झाली होती, अशातच त्यांनी नुकत्याच शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा आणखी नवीन वाद निर्माण होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे

Tags: entertainment newsmarathi actormarathi entertainment newsMarathi newssharad ponksheमनोरंजन बातमीमराठी अभिनेतामराठी बातमीशरद पोंक्षे
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shiva Marathi Serial
Entertainment

‘शिवा’ मालिकेतील एकाचवेळी दोन कलाकारांच्या एक्झिट, भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कारण, म्हणाले…

जून 6, 2025 | 12:23 pm
Housefull 5 Review
Entertainment

Housefull 5 Review : ‘हाऊसफुल ५’ पाहावा की नाही?, प्रेक्षकांनी चित्रपटाचा ट्विस्टच सांगितला, खरंच तुफान गर्दी आहे का?

जून 6, 2025 | 11:53 am
Niranjan Kulkarni Wedding Video
Entertainment

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याचं थाटामाटात लग्न, पारंपरिक पद्धतीने पार पडला विवाहसोहळा, लूकची चर्चा

जून 6, 2025 | 11:42 am
Priya bapat online shopping experience
Entertainment

प्रिया बापटला Blinkit ने पाठवला सडलेला कोबी, फोटोही केला शेअर, म्हणाली, “घाणेरड्या दर्जाच्या भाज्या…”

जून 6, 2025 | 11:07 am
Next Post
Kangana Ranaut Post

"मिठी मारावीशी वाटली अन्…", अयोध्येमध्ये बागेश्वर महाराजांना भेटली कंगना रणौत, भारावून गेली, म्हणाली, "चरण स्पर्श…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.