अलीकडे सोशल मीडिया व त्यावर विविध प्रकारचा कंटेट तयार करणे हे अगदी समीकरणच झाले आहे. यात मराठीतील काही कलाकारही मागे नाहीत. अभिनयासह सोशल मीडियावर कंटेट निर्मिती करतात. यापैकीच एक नाव म्हणजे क्रांती रेडकर. क्रांती ही अभिनय, नृत्य, परीक्षण यासह सोशल मीडियावर विविध व्हिडीओ तयार करत प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. ती तिच्या लाडक्या लेकींचे अनेक मजेशीर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करत असते. तिच्या या व्हिडीओला चाहत्यांकडूनदेखील चांगलीच पसंती मिळते.
अशातच क्रांतीने आणखी एक नवीन व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओलादेखील चाहत्यांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. क्रांतीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती असं म्हणते की, “आपण कधी कधी खूप थकलेलो असतो तेव्हा देवा, ईश्वरा, पांडुरंगा असं म्हणतो. तर मीसुद्धा कधी कधी थकून बसत असताना देवा, ईश्वरा, पांडुरंगा, स्वामी समर्थ महाराजा कुठे आहात तुम्ही असं म्हणते. मी हे खूप आधीपासूनच करते आहे. कारण घरात आई स्वामी भक्त आणि मग मी ही स्वामी भक्त. त्यामुळे ते अंगवळणी पडलं आहे.”
यापुढे ती म्हणाली, “छबील मागे खेळत होती आणि हे मला माहीत नव्हतं. मी एकेदिवशी अशीच थकून बसत असताना देवा, पांडुरंगा, ईश्वरा, स्वामी समर्थ महाराजा कुठे आहात तुम्ही असं बोलले आणि तिने हे माझे बोलणे ऐकताच मागून हळू आवाजात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हटलं. मला माहीत नाही, तिला हे बोलवं असं का सुचलं? जे स्वामी भक्त आहेत त्यांना हे वाक्य माहीत आहे. पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं मुख्य व प्रेरणादायी वाक्य आहे. त्यामुळे लहान मुलांच्या तोंडून स्वामीच बोलतात बाकी काही नाही.”
हेही वाचा – Bigg Boss 17 : आयेशा, ईशानंतर विकी जैनचा ‘बिग बॉस’च्या घरातील प्रवास संपणार?, नवीन प्रोमोमुळे चर्चांना उधाण
दरम्यान, क्रांतीच्या या व्हिडीओला चाहत्यांकडून लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओखाली “किती छान, किती गोड, स्वामींचा आशीर्वाद असाच कायम तुमच्या पाठीशी राहुदेत, श्री स्वामी समर्थ” अशा अनेक कमेंट्स केल्या आहेत. तसेच अनेकांनी यानिमित्ताने छबीलचे कौतुकही केले आहे.