शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मिठी मारावीशी वाटली अन्…”, अयोध्येमध्ये बागेश्वर महाराजांना भेटली कंगना रणौत, भारावून गेली, म्हणाली, “चरण स्पर्श…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 23, 2024 | 3:15 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana Ranaut Post

"मिठी मारावीशी वाटली अन्…", अयोध्येमध्ये बागेश्वर महाराजांना भेटली कंगना रणौत, भारावून गेली, म्हणाली, "चरण स्पर्श…"

अयोध्या येथील राम मंदिराचे उद्घाटन व रामलल्लाचा अभिषेक सोहळा काल (२२ जानेवारी) रोजी थाटामाटात संपन्न झाला. या मोठ्या सोहळ्यात देशातील अनेक दिग्गज मंडळी व कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. दरम्यान अभिनेत्री कंगना रनौत एक दिवस आधी अयोध्येला पोहोचली होती. सोशल मीडियाद्वारे ती तिच्या या सोहळ्यातील सर्व अपडेट देत होती. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याव्यतिरिक्त ती इतर धार्मिक विधींमध्ये देखील भाग घेताना दिसली आहे. (Kangana Ranaut Post)

कंगना रनौतने जगद्गुरू रामभद्राचार्य यांची भेट घेतली. याशिवाय त्यांनी प्रसिद्ध हनुमानगढ़ी मंदिराला भेट दिली आणि आजूबाजूचा परिसरही झाडून घेतला. कंगना रनौतने बागेश्वर धाम सरकार म्हणजेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचीही भेट घेतली. त्यांनाही राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले होते. कंगनाने त्यांच्याबरोबरचा एक फोटो शेअर करत ‘लहान भाऊ’ असं म्हणत हा फोटो शेअर केला होता. त्यांनी सांगितले की, त्यांना पहिल्यांदाच त्यांच्या वयापेक्षा लहान गुरू मिळाला आहे.

आणखी वाचा – Video : आधी अपमान, नको नको ते बोलला अन्…; विकी जैनने गुडघ्यावर बसून मागितली बायकोची माफी, म्हणाला, “चुका झाल्या आणि…”

कंगना रनौतने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे धीरेंद्र कृष्ण शास्त्रीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्याबरोबर इतर अनेक साधू पाहायला मिळाले. हा फोटो शेअर करत कंगनाने तिच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “मी पहिल्यांदा माझ्या वयापेक्षा लहान गुरुजींना भेटले, ते माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत, मला त्यांना लहान भावाप्रमाणे मिठी मारावीशी वाटली” असं ती म्हणाली.

आणखी वाचा – अयोध्येमध्ये रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठासोहळ्याच्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने शेअर केला अभिमानास्पद क्षण

कंगना रणौतने पुढे लिहिले आहे की, “पण नंतर मला आठवले की आपण वयाने गुरु होत नाही, कर्माने गुरु बनतो, गुरुजींचे चरण स्पर्श करुन आशीर्वाद घेतले. जय बजरंगबली” असं म्हटलं आहे.

Tags: bollywood newsentertainmentkangana ranautkangana ranaut and bageshwar dham sarkarkangana ranaut ram mandir
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Oscars 2024 nominations when and where to watch see the details

‘या’ दिवशी पार पडणार ‘ऑस्कर २०२४’ पुरस्कार सोहळा, वाचा कधी व कुठे पाहता येणार?, कोणत्या चित्रपटांना नामांकन मिळणार?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.