बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“एनर्जी कुठून आणू?”, चाहत्याच्या ‘त्या’ मॅसेजने संकर्षण कऱ्हाडे भारावला, म्हणाला, “आयुष्यभर…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 1, 2025 | 5:33 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sankarshan Karhade

"एनर्जी कुठून आणू?", चाहत्याच्या 'त्या' मॅसेजने संकर्षण कऱ्हाडे भारावला, म्हणाला, "आयुष्यभर…"

Sankarshan Karhade : लेखक, कवी, अभिनेता आणि सूत्रसंचालक या चार क्षेत्रात नेहमीच आपला दबदबा निर्माण करणारा अभिनेता म्हणजे संकर्षण कऱ्हाडे. संकर्षणने आजवर अनेक त्याच्या अभिनयाच्या जादूने रसिकांच्या मनात घर केलं, सध्या रंगभूमीवर संकर्षण आपल्या अभिनयाने छाप पाडत आहे. संकर्षणचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. संकर्षणला त्याच्या कामाची नेहमीच पोचपावती मिळालेली पाहायला मिळाली आहे. आणि चाहत्यांच्या या प्रेमाबाबत संकर्षण नेहमीच सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतो. अशातच संकर्षणने चाहत्याच्या एका मॅसेजची पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये संकर्षण भारावून गेल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या संकर्षणच ‘नियम व अटी लागू’ हे नाटक जोरात सुरु आहे.

संकर्षणला त्याच्या एका चाहत्यानं सोशल मीडियावर आईच्या वाढदिवसानिमित्त तिला तुझं ‘नियम व अटी लागू’ हे नाटक दाखवत असल्याचा मॅसेज केला. त्या चाहत्यानं संकर्षणला मॅसेज करत म्हटलं आहे की, “माझ्या आईचा ६० वा वाढदिवस आहे. तिच्यासाठी एक सरप्राइज प्लॅन केलं आहे. तिला तुझं काम खूप आवडतं म्हणूनच तिला आणि तिच्या लहानपणीच्या मैत्रिणींना ‘नियम व अटी लागू’च्या बालगंधर्वमधील प्रयोगाला पाठवत आहे. आई जवळपास ३६ वर्षांनंतर नाटक बघायला येणार आहे. आशा आहे की, तिला हे सरप्राईज आवडेल”.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या आईची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल, अभिनेत्री रुग्णालयात धावत पळत जाताना दिसली आणि…

View this post on Instagram

A post shared by Sankarshann G Karhade (@sankarshankarhade)

हा मॅसेज पाहून संकर्षण भारावून गेला आहे. त्याबद्दल त्यानं सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यानं पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, “खरं सांगू…? कधी कधी खूप दमायला होतं. एनर्जी कुठून आणू, असा प्रश्नही पडतो. चिडचिड होते. आता मला कोणी नको, असा संताप होतो. पण… पण… असा एक मेसेज सोशल मीडियावर येतो की, कुणीतरी आपल्या आईच्या ६० व्या वाढदिवसाला तिला गिफ्ट म्हणून माझं नाटक दाखवतंय आणि अनेक वर्षांनंतर ती आई हा कलाकार आवडतो म्हणून यायला तयार होते”.

आणखी वाचा – “मी माणूस म्हणून लायकीचा नाही”, ओंकार राऊत असं भलतंच काहीस बोलून गेला आणि…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत म्हणाला…

पुढे त्याने लिहिलं, “सगळं बाजूला राहतं आणि असा विचार येतो की, असा प्रयोग व्हावा की, अनेक वर्ष पोरांनी आपल्या आईला आणि आईनं पोरांना म्हणावं ‘जा या कलाकाराचं नाटक बघून ये’ अजून काय पाहिजे? तर हेच पाहिजे. आयुष्यभर हेच पाहिजे…”, असं त्याने लिहीत सोशल मीडियावर ही कौतुकाची पोस्ट शेअर केली आहे.

Tags: fan momentmarathi actorsankarshan karhade
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Salman Khan Skipped Asha Bhosle Funeral
Entertainment

Asha Bhosle Funeral : मुंबईत असूनही आशा भोसलेंच्या अंत्यसंस्काराला शाहरुख आणि सलमान खान का आले नाहीत?, कारण समोर…

एप्रिल 15, 2026 | 9:47 am
Next Post
 malaika arora harsh mehta dating

५२ वर्षीय मलायका अरोरा ३३ वर्षीय हिरे व्यापाऱ्याच्या प्रेमात, एकत्र स्पॉट होताच चर्चांना उधाण, नक्की सत्य काय?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.