shilpa shetty mother admit : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे. अशातच आता शिल्पा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. शिल्पाची आई सुनंदा हिच्याबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. वयाशी संबंधित समस्यांमुळे त्यांना दाखल करण्यात आल्याचे अहवालात म्हटले आहे. आईच्या तब्येतीची बातमी ऐकून शिल्पाने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. यावेळी मलायका अरोराही तिचा मुलगा अरहानसोबत हॉस्पिटलबाहेर दिसली. त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
शिल्पा शेट्टीचा एक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. यामध्ये ती लीलावती हॉस्पिटलच्या बाहेर असून आत जाताना दिसत आहे. तिला घाई झालेली दिसत आहे. शिल्पाच्या आईबद्दल ऐकून मलायका अरोराही हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तिच्यासोबत तिचा मुलगा अरहानही दिसला. दोघेही हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहेत. दोघांनीही तोंडाला मास्क लावले होते. शिल्पाच्या आईबद्दल जाणून चाहते तिच्यासाठी प्रार्थना करत आहेत.
आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव लवकरच अडकणार लग्नबंधनात, दिली प्रेमाची कबुली, होणारी पत्नीही आहे अभिनेत्री
व्हिडीओ पाहून एका चाहत्याने ‘देव कृपया संरक्षण करा’ अशी कमेंट केली आहे. तर दुसरा म्हणाला, ‘लवकर बरा हो.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘ती लवकरच बरी होईल.’ शिल्पाने अद्याप तिच्या आईच्या आजारपणाबाबत कोणतीही बातमी दिलेली नाही. शिल्पा आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरोधात ६० हजार कोटी रुपयांच्या फसवणुकीचा खटला न्यायालयात सुरु असल्याची माहिती आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध लुकआऊट सर्क्युलर नोटीस जारी करण्यात आली होती. दोघेही देशाबाहेर जाऊ शकत नाहीत. अभिनेत्रीने परवानगीसाठी याचिका दाखल केली होती, ती फेटाळण्यात आली होती.





