शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“मी माणूस म्हणून लायकीचा नाही”, ओंकार राऊत असं भलतंच काहीस बोलून गेला आणि…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’बाबत म्हणाला…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 31, 2025 | 12:06 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
onkar raut

"मी माणूस म्हणून लायकीचा नाही", ओंकार राऊत असं भलतंच काहीस बोलून गेला आणि…; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'बाबत म्हणाला…

onkar raut : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय रिऍलिटी शोने आजवर अनेक नवोदित कलाकारांना मोठा प्लॅटफॉर्म मिळवून दिला. या रिऍलिटी शो मुळे अनेक कलाकारांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ओंकार राऊत, निखिल बने, शिवाली परब, प्रथमेश शिवलकर, वनिता खरात, रोहित माने यांसारखे अनेक कलाकार घराघरांत पोहोचले. या कलाकारांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इतकी प्रसिद्धी मिळूनही आजही या कलाकारांचे जमिनीवर पाय आहेत. अशातच आता ओंकार राऊतने नुकतीच एका पाॅडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान ओंकारने हास्यजत्रेबद्दल भाष्य केलं आहे.

ओंकार राऊतने नुकतीच MHJ Unplugged या पाॅडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीदरम्यान ओंकारला “तुझ्यासाठी हास्यजत्रा काय आहे?”, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अभिनेता म्हणाला की, “प्रेम… हास्यजत्रा माझ्यासाठी प्रेम, संधी आणि माझं कुटुंब आहे. खरंतर हास्यजत्रेबद्दल काय बोलणार ना? त्यांनी मला सगळं दिलं. आई-बाबा कोण आहेत तुझ्यासाठी असं विचारलं तर आपण नाही सांगू शकत की, आई-बाबा कोण आहेत आपल्यासाठी. तर तसं हे आहे”.

आणखी वाचा – ‘लक्ष्मी निवास’ फेम मेघन जाधव लवकरच अडकणार लग्नबंधनात, दिली प्रेमाची कबुली, होणारी पत्नीही आहे अभिनेत्री

View this post on Instagram

A post shared by Onkar Raut (@onkar_raut)

पुढे तो म्हणाला, “जेव्हा कोणाकडे काम नव्हतं, तेव्हा माझ्याकडे काम होतं. का? हास्यजत्रामुळे. कोव्हिडमध्ये सगळे घरी होते, मी काम करत होतो. पैसे येतायत वैगरे, तो नंतरचा भाग आहे. पण तेव्हा काम होतं. लोकांना बाहेर जायचं होतं, तेव्हा मी काम करत होतो. कारण, मी हास्यजत्रेमध्ये होतो. हास्यजत्रेने ओळख दिली, प्रेम दिलं. मला अजूनही वाटतं, मी माणूस म्हणून तेवढ्या लायकीचा नाहीये, जेवढं प्रेम मला लोक देतायत”.

आणखी वाचा – शिल्पा शेट्टीच्या आईची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल, अभिनेत्री रुग्णालयात धावत पळत जाताना दिसली आणि…

शेवटी तो म्हणाला, “मी खूप ग्रेट समजतो, या सगळ्या गोष्टीला, हास्यजत्रेला. तुम्ही डिझर्व्ह पण करत नाहीत, तेवढं प्रेम ते देतात. खरं सांगायचं तर, मी नाही हे प्रेम डिझर्व्ह करत. कारण, मला माहितीये मी माणूस म्हणून कसा आहे. पण तरी लोक ते प्रेम देतात आणि त्यानंतर बदलण्याची जी जबाबदारी वाढते ना. हास्यजत्रेनं ते केलं. मी माणूस म्हणून खूप बदललो”.

Tags: maharashtrachi hasyajatramarathi actoronkar raut
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Next Post
Abhang Tukaram release date

‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून उलगडणार जगद्‌गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या गाथेची कथा, ७ नोव्हेंबरला सिनेमागृहात

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.