Sankarshan Karhade Post : सुसंस्कारी, सोज्ज्वळ, संयमी कलाकारांच्या यादीत एका अभिनेत्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे. संकर्षण कऱ्हाडे सिनेविश्वात केवळ अभिनेता म्हणूनच नव्हे तर गायक, लेखक, कवी म्हणून बराच लोकप्रिय आहे. इतकंच नाही तर सूत्रसंचालक म्हणून त्याने साऱ्या चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. आपल्या कलागुणांमुळे अल्पावधीतच हा अभिनेता अधिक लोकप्रिय झाला. नाटक, मालिका आणि टेलिव्हिजन शो अशा विविध माध्यमातून प्रेक्षकांची मनं जिंकणारा संकर्षण सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रीय असतो. संकर्षण त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटद्वारे अनेक पोस्ट शेअर करत असतो. मराठी मनोरंजनसृष्टीतील एक उत्तम, गुणी व चतुरस्त्र कलाकार म्हणून त्याची ओळख आहे.
संकर्षण त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी सोशल मीडियावर शेअर करत असतो. सोशल मीडियावर तो नेहमीच सक्रिय असतो. नेहमीच तो काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. अशातच त्याने नुकतीच शेअर केलेली पोस्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता, कवी सध्या त्याच्या गायनाच्या संकर्षण व्हाया स्पृहा या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र दौरा करताना दिसत आहे. या दौऱ्या दरम्यानचे अनेक अनुभव तो पोस्टद्वारे शेअर करत असतो.
यावेळी अभिनेत्याने या प्रवासादरम्यान पश्चिम महाराष्ट्रातील जेवणाचा आस्वाद घेण्याचा अनुभव शेअर केला आहे. यावेळी अभिनेत्याने कराड येथे खास तेथील जेवणाचा आस्वाद घेत कौतुक केलं आहे. यावेळी जेवण करतानाचे काही खास फोटो त्याने पोस्ट करत साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. यावेळी अभिनेत्याने दिलेल्या खास कॅप्शनने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. कॅप्शनमध्ये अभिनेत्याने तेथील जेवणाच कौतुक करत खास पोस्ट लिहिली आहे. संकरातून नेहमीच विविध ठिकाणांना भेट देत तेथील पदार्थांचा आस्वाद घेत असतो.
अभिनेत्याने यावेळी पश्चिम महाराष्ट्राला भेट देत पोस्ट शेअर केली आहे. त्याखाली कॅप्शन देत तो असे म्हणाला आहे की, “क्या बात है.पश्चिम महाराष्ट्राच्या हद्दीत आलो की माझं डोकंच काम करनं बंद होतं बघा. कराडमध्ये असला वाद खुळा जेवलोय. ज्वारीची, बाजरीची भाकरी, भरलं वांगं, आख्खा मसूर , शेव भाजी आणि सगळ्यात शेवटी मऊ मऊ ईंद्रायणी भात. हे सगळं तुमच्याशी शेअर केलं की जास्त पोट भरतंय बघा. बाकी बरंय नव्हं?. आणि हो या गाण्याचा आणि फोटोचा काहीच संबंध नाही आहे पण जेवताना हेच गाणं इथल्या मुलांनी लावलं होतं”. अभिनेत्याची ही पोस्ट सध्या साऱ्यांचा पसंतीस पडत आहे.