Yogita Chavan And Ankita Walawalkar Meet : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजलं. यंदाच्या या पर्वात सर्वच स्पर्धकांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. आज बिग बॉस मराठी संपून अनेक दिवस झाले असले तरी या पर्वातील स्पर्धक मंडळी घराबाहेर एकमेकांना भेटताना, एकमेकांसह बोलताना दिसत आहेत. त्यामुळे हे स्पर्धक नेहमीच चर्चेत असलेले पाहायला मिळतात. या पर्वातील विशेष चर्चेत राहिलेली स्पर्धक म्हणजे कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर. अंकिता सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांतच अंकिता लग्नबंधनात अडकणार आहे. संगीतकार कुणाल भगतबरोबर अंकिताचा विवाहसोहळा संपन्न होणार आहे. आणि सध्या अंकिता व कुणालची जोरदार लगीनघाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे.
लग्नाआधी अंकिता व कुणालने नुकतीच योगिता चव्हाण व सौरभ चौघुलेची भेट घेतली आहे. योगिता व सौरभ यांच्या भेटीदरम्यानचा एकत्रित फोटो अंकिताने पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये अंकिता, कुणाल, योगिता आणि सौरभ चौघुले पाहायला मिळत आहेत. हा फोटो शेअर करत अंकिताने त्याखाली दिलेल्या कॅप्शनने साऱ्यांच्या नजरा वळविल्या आहेत. हा फोटो शेअर करत अंकिताने लिहिलं आहे की, “दोन अधिक विचार करणारे आणि दोन उत्तम संवाद साधणारे एकाच फ्रेममध्ये. ओळखा पाहू कोण?”.
आणखी वाचा – आभ्याच्या बोलण्यामुळे रेश्मा नाराज, केवडाप्रती असलेला प्रेम पाहवेना, नात्याला कोणतं नवं वळण मिळणार?
अंकिताची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या पोस्टवरील ‘डीपी दादा’ म्हणजे धनंजय पोवारच्या प्रतिक्रियेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. धनंजयने मजेशीर प्रतिक्रिया देत अंकिताची फिरकी घेतली आहे. या पोस्टवर धनंजय पोवार कमेंट करत असं म्हणत आहे की, “पचणार नाही दोघी बहिणी आणि दोन्ही जावयांना”. धनंजयची कमेंट पाहून अंकिता म्हणतेय की, “तुम्ही आधी कोणाच्या बाजूने आहात ते सांगा”. यावर धनंजय उत्तर देत म्हणाला, “नेहमी तुझ्या”.
आणखी वाचा – वंदना गुप्तेचं मालिकाविश्वात कमबॅक, ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये महत्त्वाची भूमिका, प्रोमो व्हायरल

धनंजयच्या कमेंटवर योगितानेही कमेंट करत म्हटले की, “आम्ही मटण बिर्याणी खाल्ली बरं का”. धनंजयच्या या कमेंटवर सौरभ चौघुलेनेही कमेंट केली आहे. सौरभने कमेंट करत डीपीला म्हटलं की, “तुम्ही आधी भेटा. आपण नियोजन करु”. आता धनंजयला हे सगळे केव्हा भेटणार, आणि तेव्हा काय राडा होणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.