मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार मंडळी ही त्यांच्या कामाव्यतिरिक्त आध्यात्मिक कार्यातही तितकेच सक्रीय असतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ता अलीकडेच तिच्या ‘फुलवंती’ चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रचंड व्यग्र होती. प्रोडक्शन, निर्मिती, प्रमोशन आणि मुलाखती या सगळ्यात एक निर्माती व अभिनेत्री म्हणून म्हणून तिची चांगलीच धावपळ सुरु होती. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्रीने श्री सोमनाथ आणि श्री नागेश्वर या गुजरातमधील ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतले. २०२३ मध्ये तिने एक संकल्प केला होता की, ती १२ ज्योतिर्लिंगाची यात्रा करणार आहे. ही यात्रा एकाच प्रवासात करता येणं तिच्यासाठी शक्य नसल्याने अभिनेत्री टप्प्याटप्प्याने ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेते आहे. Prajakta Mali visit to Shri Ghrishneshwar Jyotirlinga Temple)
अभिनय, निर्मिती व व्यवसाय अशा तीनही क्षेत्रात सक्रीय असणारी प्राजक्ता सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती आपले अनेक फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सोशल मीडियावर अनेक स्टायलिश फोटो व व्हिडीओ शेअर करणारी प्राजक्ता तिच्या देवदर्शनाचे काही खास क्षणही सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. नुकतीच तिने छत्रपती संभाजीनगरमधील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग या मंदिराला भेट दिली आणि याचे काही खास क्षण तिने शेअर केले आहेत.
प्राजक्ताने शेअर केलेल्या या फोटोमध्ये ती शिवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये ती शिवाची आरती करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये पिंडीवर बेल वाहताना दिसत आहे. तर पुढच्या फोटोमध्ये ती देवासमोर नतमस्तक झाली आहे. तर यापुढे तिने मंदिराबाहेरील फोटोही शेअर केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. अनेकांनी या फोटोला लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Bigg Boss 18 च्या ग्रँड फिनाले पूर्वीच विजेत्याचे नाव समोर, कोण ट्रॉफी घरी घेऊन जाणार?
दरम्यान, २३ ऑक्टोबर २०२३ महाराष्ट्रातल्या परळी वैजनाथपासून या यात्रेची सुरुवात केली होती. त्यावेळीच अभिनेत्रीने म्हटले होते की, व्यग्र वेळापत्रामुळे तिला ही यात्रा एकसंथपणे करता येणं शक्य नसल्याने ती जमेल तशी याची पूर्णता करणार आहे. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२४ रोजी या संकल्पातील दुसरा टप्पा पार केला होता, तिने नाशिकमधील त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले आणि आता तिने छत्रपती संभाजीनगर मधील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतलं.