“जाड भुवया मानाने मिरवत अत्यंत निर्बुद्ध…..” चेतनासाठी समीरच्या हटके शुभेच्छा

Samir Choughule Chetna Bhat
Samir Choughule Chetna Bhat

सामान्य प्रेक्षषकांच्या टेन्शन वरची मात्रा म्हणून प्रसिद्ध असलेली महाराराष्ट्राची हास्य जत्रा आजपर्यंत प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आली आहे. या कार्यक्रमातील स्किट्स सगळ्यांना खळखळून हसवतात. यातील अनेक कलाकार आज चाहत्यांच्या गळयातील ताईत झाले आहेत. समीर चौघुले, प्रसाद खांडेकर, गौरव मोरे, रोहित माने, नम्रता संभेराव, वनिता खरात असे अनेक कलाकार आपल्या अभिनयायने ही जबाबदारी पार पडत आहेत. या कलाकारांमध्ये आणखी एक नाव म्हणजे अभिनेत्री चेतना भट. आज चेतनाचा वाढदीवस चेतनाच्या वाढदीवसानिमित्त अभिनेता समीर ने तिच्यासाठी खास पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(Samir Choughule Chetna Bhat)

चेतना सोबतचा फोटो पोस्ट करत समीर ने लिहिलंय ” Happy birthday @bhatchetana …जाड भुवया मानाने मिरवत अत्यंत निर्बुद्ध मुलीचं वरकरणी सोप्प वाटणार पण खूप कठीण असणार पात्र ही लीलया रंगवते . अवीट रागिणी म्हणून “हो ना हो ना” म्हणत संयमित अभिनय करताना अचानक मध्येच राग अनावर न झाल्याने ही ज्या प्रकारे लोचन मजनूच्या अंगावर चिडून जाते ते निव्वळ सुखद असत..आमच्या चेतूच्या अंगात “जर्की विनोद” हि ठाई ठाई भरलाय….सासू सुनेच्या प्रहसनात हिच्या अंगात वारं शिरत..आणि हीच्यातली खरी वेडसर मुलगी बाहेर येते आणि जे काही करते ते हसून हसून मुरकुंडी वळवत….हिला स्क्रिप्ट मध्ये एक वाक्य असो वा हजार वाक्य , हिला अख्खं स्क्रिप्ट तोंडपाठ असत..

कोणतीही गोष्ट साध्य होईपर्यंत प्रचंड मेहेनत करायची हा तिचा गुण मला प्रचंड आवडतो…चेहऱ्यावर नेहेमी निखळ हास्य घेऊन फिरणारी आमची चेतू ही उत्कृष्ठ नृत्यांगना सुद्धा आहे..चेतु बरोबर मंच शेयर करण या सारखा दुसरा आनंद नाही …आपल्या घरावर, माणसांवर,मित्र मैत्रीणीवर नितांत प्रेम करणारी आमची चेतना खूप हळवी सुद्धा आहे..आमच्या chetu ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रेम..(Samir Choughule Chetna Bhat)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You May Also Like
Saie Tamhankar Liplock
Read More

प्रिया बापट नंतर सईचा “लेस्बियन लिपलॉक” सीन होतोय वायरल सईच्या आगामी क्राईमबेस सिरीजचा टिझर लाँच

अभिनेत्री चर्चेत केवळ लूक्समुळे नसतात तर काही तर त्यांच्या अभिनयातील काही हटके सीन्समुळे सुद्दा असतात. सध्या अभिनेत्री सई…
(Sayli Sanjeev Ruturaj Gaikwad)
Read More

” मी तुम्हा दोघांसाठी…..” ऋतुराजच्या लग्नाचा फोटो पोस्ट करत सायली म्हणते…

लोकप्रिय लोकांच्या यादीत खूप कमी नाव अशी मिळतात ज्यांच्या बद्दल कोणत्याही अफवा पसरवल्या जात नाहीत. पण अनेक कलाकारांना…
Namrata Sambherao Father
Read More

“बाहुलीच हवी मला द्यामज आणुनी” नम्रताची वडिलांसाठी भावुक पोस्ट

वडील म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्वाची बाजू. आपल्या आयुष्याला शिस्त देण्याचं काम केलं जात ते वडिलांकडून. आज महाराष्ट्राची…
Rinku Rajguru Sairat
Read More

फक्त १० मिनिटांची ऑडिशन आणि महाराष्ट्राला मिळाली “आर्ची”….

एखादा कलाकार अनेक चित्रपटानंतर लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचतो पण काही कलाकारांना एक चित्रपट मेहनतीची संधी देतो आणि त्या संधीच…
Milind Gawali Special post
Read More

‘एका घारीसारखी तिची माझ्यावर…’ मिलिंद गवळी यांची लेकीसाठी भावुक पोस्ट

बाप मुलीचं नातं हे अर्थात नेहमीच खास आणि हळवं असत. या नात्याला असलेला हळुवार स्पर्श हा सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार…