हास्यजत्रा आणि शो मधील हास्यवीर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात कोणतीही कसूर ठेवत नाहीत. समीर चौघुले या माणसाशिवाय आणि नावाशिवाय हास्यजत्रा अपुरी वाटते. अभिनयातील सहजता आणि विनोदाचं उत्तम टाईमिंग हे समीकरण, समीर चांगलंच जुळवून आणतो. त्या मुळे हास्यजत्रेतील त्याच्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक तितकंच प्रेम करतात.(Samir Choughule Special Post)
कधी फॅन मोमेन्ट मुळे, गाजलेल्या स्किट्स मुळे तर कधी कलाकारानं सोबत असणाऱ्या बॉण्डिंग मुळे समीर कायम चर्चेत असतो. हास्यजत्रेतील सर्व कलाकारांचं एकमेकांसोबत पडद्यामागे फार छान बॉण्डिंग आहे. त्यांची हीच एनर्जी त्यांच्या स्किट्स मध्ये पाहायला मिळते. आणि प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करण्यात हे कलाकार यशस्वी होतात.
पाहा काय आहे समीरची पोस्ट ? (Samir Choughule Special Post)
मराठी माणूस कायम दुसऱ्याचा पाय खेचतो. किंवा आपल्या सोबत काम करणाऱ्यांकडे आपण कायम फक्त स्पर्धेच्या दृष्टिकोनातूनच बघतो असं आपला समज असतो. परंतु हल्लीच समीरने एका स्किट्स साठी रसिकांचं विशेष कौतुक केलं. तर नुकतीच त्याने अभिनेता श्याम राजपूत याच्या वाढदिवसानिमित्त एक विशेष पोस्ट शेअर केली आहे.
हे देखील वाचा : समीरने रसिकाला दिली कौतुकाची भेट
श्याम राजपूत याचा फोटो शेअर करून समीरने कॅप्शन मध्ये म्हंटले आहे,श्याम राजपूत हॅपी बर्थडे,आमच्या हास्यजत्रेच ‘शहाळ’ बाहेरून कडक पण मनाने तितकाच मुलायम. आमचा श्याम श्याम स्वभावाने साखरे एवढा गोड आहे. अहिराणी ही काही त्याची मूळ भाषा नव्हे. पण, अहिराणी भाषेवर खूप मेहनत करून त्याने प्रभुत्व मिळवलं आहे.क्रिकेटवर खास प्रेम असणाऱ्या शामने अनेक वेळा बेभान क्रिकेट खेळण्यापाई स्वतःच तंगड मोडून घेतलं आहे.आमचा भारदस्त शाम जेव्हा केविलवाण्या चेहऱ्याने काम करतो, तेव्हा मला बेदम हसवतो. शाम तुला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.(Samir Choughule Special Post)