एखाद्यच नशीब जोरावर असलं कि एकापेक्षा एक सुखदायक गोष्टी त्याच्या आयुष्यात घडत जातात असं म्हणतात. असच काहीस झालाय सध्या द केरला स्टोरी या चित्रपटामुळे चर्चेत असलेली अभिनेत्री अदा शर्मा सोबत. द केरला स्टोरीच्या यशानंतर अदा शर्मा आता ‘द गेम ऑफ गिरगिट’ या आगामी चित्रपटा दिसणार आहे.विशेष म्हणजे या चित्रपटात अदा सोयाबीत मराठमोळा अभिनेता तसेच बॉलीवूड मध्ये देखील नाव कमवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(Adah Sharma Shreyas Talpade)
या चित्रपटात अदा ही पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. मध्यंतरीच्या काळात एक व्हायरल झालेला गेम म्हणजे ब्लू व्हेल या गेममुळे अनेकांना प्राण ही गमवावे लागले एकंदरीतच या गेम वर आधारित हा चित्रपट असल्याचे सांगितले जात आहे. तर या चित्रपटाचे दिगदर्शन विशाल पांड्या यांनी केले असल्याचे हे समोर आले आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने सोशल मीडियावर आणि बॉक्स ऑफिसवर चांगलंच धुमाकूळ घातला आहे. सिनेमाचा विषय, कथानक या सर्वच घटकांमुळे हा सिनेमा विशेषतः चर्चेत आहे. सर्वच स्तरातून या चित्रपटावर वेगवेगळं भाष्य केलं जात, काही लोक या चित्रपटाला घेऊन चांगली प्रतिक्रिया देत आहेत तर काहींनी या चित्रपट पाहू नका असा नारा लगावला आहे. अशी सर्व परिस्थिती असली तरी चित्रपटाचा टिझर पाहूनच प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.(Adah Sharma Shreyas Talpade)