झी मराठी वरील अप्पी आमची कलेक्टर ही मालिका चर्चेत असणाऱ्या मालिकांन पैकी एक आहे. मालिकेचे कथानक, येणारी वेगवेगळी वळण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. सध्या मालिकेत अप्पी कलेक्टर झाली आहे. आणि भ्रष्टाचाराविरोधात तिने आवाज उठवला आहे.(Rohit Parshurm Wife Babyshower)
या मालिकेतील अर्जुन म्हणजे अभिनेता रोहित परशुराम. मालिकेतील रोहितची भूमिका अनेक ट्विस्ट निर्माण करत असते. अप्पीने कलेक्टर व्हावं म्हणून त्याने अप्पीला साथ दिली तो स्वतः एक पोलीस ऑफिसर दाखवण्यात आला आहे. परंतु सध्या अप्पी भ्रष्टविरोधात उभी आहे. पंरतु या सगळ्यात अर्जुनचा देखील हात आहे. त्याची भूमिका देखील प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे.
पाहा रोहितच्या पत्नीचे डोहाळजेवणाचे खास क्षण (Rohit Parshurm Wife Babyshower)
रोहितने काही दिवसां पूर्वी तो बाबा होणार असल्याची बातमी त्याच्या सोशल मीडियावरून प्रेक्षकांसोबत शेअर केली होती.त्यांच्या या फोटोजना प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली, अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा देखील दिल्या.(Rohit Parshurm Wife Babyshower)

आता रोहित ने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून बायकोच्या डोहाळेजेवणाचा खास व्हिडिओ शेअर केला आहे. माय डॉल्स डे असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिल आहे. पारंपरिक आणि साग्रसंगीत पद्धतीने हा सोहळा पार पडला. रोहितची पत्नी पूजा हिरव्या रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती. फुलांचे दागिने तिने परिधान केले होते.विशेष अशी सजावट देखील केलेली पाहायला मिळाली.त्यांच्या बाळाच्या येण्याची ओढ आता साऱ्यांनाच लागली आहे. अनेकांनी कमेंट करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हे देखील वाचा : वाढदिवसाचं औचित्य साधत राधा सागरने दिली गुडन्यूज