आपल्या पहिल्या कामाचं एकतर कौतुक केलं जात किंवा त्याला नाव ठेवली जातात पण त्यातून आपण शिकतोय कि खचून जातो हे पूर्णतः आपल्या हातात असत. नाव ठेवण्याचा हा प्रकार कोणसोबतही घडू शकतो. असच घडलेलं बॉलीवूड मध्ये आण्णा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या अभिनेता सुनील शेट्टी सोबत. बार्बरशॉप विथ शंतनू च्या पॉडकास्ट मध्ये हा किस्सा सुनील शेट्टी यांनी शेअर केला आहे.(Suniel Shetty Struggle)
११९२ साली प्रदर्शित झालेल्या बलवान या चित्रपटात सुनील शेट्टी यांनी अभिनयाची पहिली पायरी चढली. आणि त्याच चित्रपटातून मनोरंजन विश्वाला एक ऍक्शन हिरो मिळाला. भूमिका पोलिसांची असो वा कोणतीही सगळ्या भूमिकांमध्ये सुनील शेट्टी टच पाहायला मिळतोच. आज अनेक चित्रपटांमधून, वेब सिरीजमधून काम केल्यानंतर सुनील शेट्टी यांनी पहिल्या कामाचं झालेलं कौतुक आणि ठेवण्यात आलेल्या नावांबद्दल देखील सांगितले.

बलवान चित्रपटातील अभिनयानं प्रेक्षकांनी सुनील शेट्टी यांना हिरो म्हणून स्वीकारलं पण एका प्रसिद्ध समीक्षकाने त्यांना ” आण्णा तू इडल्याचं विक अभिनयाचा नाद सोड” असं सांगितलं. एवढच नाही तर माझी तुला बालनाट्या मध्ये असलेल्या झाडा सोबत देखील केली होती. त्यावेळी मला या गोष्टीचं वाईट देखील वाटलं होतं असं हि सुनील शेट्टी ने सांगितलं. घडलेल्या या प्रकारावरून सुनील शेट्टी यांना हे समजलं कि आपण ज्या क्षेत्रात आलो आहोत ते क्षेत्र अस्थिर आहे. त्यामुळे आपल्यलाला काहीतरी दुसरा व्यवसाय सुरु करायला हवा ज्यामुळे आर्थिक अडचण निर्माण होणार नाही.(Suniel Shetty Struggle)
हे देखील वाचा – ‘मला लग्न झालेली बाई माझ्या चित्रपटात नको आहे’ कोठारेंनी झपाटलेला मध्ये निवेदिता यांना नाकारला रोल
परिस्थती लक्षात घेऊन सुनील यांनी त्यांचा व्यवस्यास सुरु केला पण त्याची वेळ कधी आलीच नाही. अभिनयाचा कोणताही वारसा नसताना, कोणताही अभ्यास नसताना देखील अनेक बहारदार चित्रपटांमध्ये काम करून सुनील शेट्टी यांनी त्यांचं अस्तित्व निर्माण केलं. आणि आज ही त्यांचा अभिनय तितक्याच आत्मीयतेने प्रेक्षकांकडून पाहिला जातो. ऍक्शनप टांच्या यादीत बॉलीवूड मधलं आण्णा हे नक्की घेतलं जाईल.
