छोट्या पडद्यावर खलनायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणारी अभिनेत्री म्हणजे राधा सागर.

आई कुठे काय करते या मालिकेतील अंकिता आणि सुंदर मनामध्ये भरली मालिकेतील अभिलाषा या राधाच्या दोन्ही पात्रांनी तिला लोकप्रियता मिळवून दिली. (Radha Sagar Goodnews)

सोशल मीडियावरही राधा बऱ्यापैकी सक्रिय असते. ती नेहमीच तिचे फोटोशूटचे फोटो शेरा करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.

अशातच आठवड्या भरापूर्वी राधाने एक फोटोशूट चा फोटो पोस्ट करून काहीतरी खास लवकरच अशा कॅप्शन दिल होत. (Radha Sagar Goodnews)

आणि आज राधाने तिच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हे काहीतरी खास तिच्या इंस्टाग्रामवरील आजच्या व्हिडिओमधून पोस्ट केलं आहे.

कुणीतरी येणार येणार ग असं म्हणत राधाने बेबी बंप मधील फोटोशूटचा व्हिडीओ शेअर केला आहे. (Radha Sagar Goodnews)

राधा सागर प्रेग्नेंट असून तिने तिच्या नवऱ्या सोबत फोटोशूट केलं आहे. त्याचा व्हिडीओ नुकताच तिने इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

राधाने दिलेल्या या गोड बातमीने तिच्या चाहत्यांनाही सुखद धक्का मिळाला आहे.

राधाच्या या पोस्टवर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत, (Radha Sagar Goodnews)

तर तिच्या चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.
