हिंदी सिनेसृष्टीमधील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेता आर.माधवन. ‘रहना है तेरे दिल मे’ या आर.माधवनच्या चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेकिंग कामगिरी केली. तर थ्री इडियट्स या चित्रपटाने त्याला प्रेक्षकांच्या मनात कायमचे स्थान मिळवून दिले.आज १ जून रोजी प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्याचं वाढदिवस आहे.त्या निमित्ताने आज जाणून घेऊया आर.माधवनची प्रेमकहाणी.(R Madhavan Love Story)
आर.माधवनची पत्नी सरिता बिर्जे ही मराठी आहे. १९९९ मध्ये ते विवाह बंधनात अडकले, लग्नाआधी जवळजवळ ८ वर्ष ते एकमेकांना डेट करत होते.आर.माधवनला आर्मी मध्ये भरती व्हायचे होते, पंरतु घरून त्यासाठी परवानगी मिळाली नाही.त्या नंतर मुंबईच्या केसी कॉलेजमधून पब्लिक स्पिकिंगमधून पद्युत्तर शिक्षण पूर्ण केले.
पाहा काय आहे आर माधवनची प्रेमकहाणी? (R Madhavan Love Story)
शिक्षण झाल्या नंतर आर.माधवनने पब्लिक स्पिकिंग कोर्स मध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. या कोर्स मध्येच सरिता आणि आर.माधवन एकमेकांना भेटले. सरीतील एअरहोस्टेस व्हायचे होते.म्हणून तिने पब्लिक स्पिकिंगचा कोर्स लावला होता, आणि आर.माधवन तिकडे तिचा शिक्षक होते.त्या कोर्स नंतर सरिताने तिचा इंटरव्हियू पास केला.

हे देखील वाचा : ये जवानी हे दिवानी मधील कलाकारांचं Reunion.. पाहा काही खास फोटोज
तो इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर, सरिताने स्वतः आर.माधवनला डिनर डेट साठी विचारले.आणि विद्यार्थिनीने विचारलेल्या या डेट साठी माधवननेही लगेच होकार दिला. त्या नंतर हळूहळू त्यांची जवळीक वाढली.आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. १९९१ मध्ये त्यांची प्रेमकहाणी सुरु झाली, आणि जवळजवळ ८ वर्षानंतर म्हणजे १९९९ मध्ये त्यांनी एकमेकांसोबत लग्न केले.परंतु तेव्हा सिनेसृष्टीमध्ये आर. माधवनच नाव कुठेही नव्हतं. लग्नानंतर अभिनेता म्हणून आर.माधवन नावा रुपाला आलं.(R Madhavan Love Story)
