अब्जाधीश मुकेश अंबानी यांचा सर्वात मोठा मुलगा आकाश अंबानी आणि त्यांची पत्नी श्लोका मेहता यांनी बुधवारी दुसरा मुलगा झाल्याची गोड बातमी दिली. डिसेंबर २०२० मध्ये या जोडप्याला पृथ्वी आकाश अंबानी हे पहिले अपत्य झाले.(Mukesh Ambani Goodnews)
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, श्लोका अंबानीने ३१ मे रोजी मुलीला जन्म दिला आहे. श्लोका अंबानीने काही महिन्यांपूर्वीच गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. काही दिवसांपूर्वीच तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ही थाटामाटात पार पडला होता. दरम्यान श्लोका अंबानीचे मॅटर्निटी फोटोशूटचे फोटोही प्रचंड व्हायरल झाले होते. श्लोका अंबानी व आकाश अंबानी यांनी कुटुंबीयांसह काही दिवसांपूर्वीच सिद्धिविनायक गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतलं होतं.
हे देखील वाचा – “हिरवी साडी,हिरवा चुडा ” वायरल होतोय गिरिजचा नवीन लुक
श्लोका आणि आकाशच्या मुलीच्या जन्माची घोषणा अंबानीच्या मुलांचे मित्र आणि त्यांचे कौटुंबिक मित्र आणि राज्यसभा खासदार परिमल नाथवानी यांचा मुलगा धनराज नाथवानी यांनी ट्विट करून केली. त्यांच्या या आनंदाच्या बातमीवर सिनेविश्वातील कलाकार मंडळींनीही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. एप्रिलमध्ये नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) च्या भव्य उद्घाटन सोहळ्यादरम्यान श्लोका मेहताने ती प्रेग्नेंट असल्याची बातमी दिली, या सोहळयाला श्लोका बेबी बंप दाखवताना दिसली.(Mukesh Ambani Goodnews)
श्लोकाच बेबी शॉवरही धुमधडाक्यात करण्यात आल होत. बेबी शॉवरमध्ये तिने आणि तिच्या मैत्रिणींनी कॅनव्हासवर अॅक्रेलिक पेंटिंग केले होते. श्लोका मेहता यावेळी लैव्हेंडर आउटफिटमध्ये दिसली.(Mukesh Ambani Goodnews)
मार्च 2019 मध्ये मुंबई येथे आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह झाला होता. श्लोका आणि आकाशला कन्यारत्न प्राप्त झाले असून अंबानी कुटुंबात सध्या आनंद पसरला आहे.