मराठी सिनेसृष्टीमधील अनेक जोड्या प्रेक्षकांच्या आवडत्या जोडया आहे.कलाकारांच्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराविषयी जाणून घेण्यात प्रेक्षकांना कायमच उत्सुकता असते.सध्या अशीच एक चर्चेत असणारी जोडी म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे आणि अभिनेत्री अमृता देशमुख यांची.बिग बॉस मराठी सीजन चार मध्ये ही नवीन जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. (prasad amruta together)
प्रसाद आणि अमृताने त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत असा खुलासा केला नसला, तरी बिग बॉसच्या घराबाहेर आल्यापासून बऱ्यचदा अमृता आणि प्रसाद एकत्र पाहायला मिळतात. ते एकमेकांना डेट करत आहेत अशा चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतात.त्यांचे फोटो रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसतात.
बिगबॉस नंतर अमृताचं रंगभूमीवर सध्या नियम व अटी लागू हे नाटक तुफान सुरु आहे.तसेच दोन कटिंग ३ या शॉर्ट फिल्म मध्ये देखील महत्वाच्या भूमिकेत अमृता पाहायला मिळाली. तर प्रसाद सध्या काव्यांजली या मालिकेत प्रीतमच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला.प्रसाद आणि अमृताच्या या भूमिकांना प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळत आहे.पंरतु या दोघांना एकत्र काम करताना बघण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे.
प्रसाद-अमृता दिसणार एकत्र (prasad amruta together)
प्रेक्षकांची ही इच्छा आता पूर्ण होताना दिसणार आहे.प्रसाद आणि अमृता एकत्र दिसणार आहेत, याबाबत अमृताने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून स्टोरी शेअर करत दिली आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून मेकअप,लाईट आणि कोऍक्टर असे कॅप्शन डेट फोटो शेअर केले आहेत. त्यात कोऍक्टर म्हणून प्रसाद जवादेचा फोटो शेअर केला आहे. (prasad jawade girlfriend)

अमृताच्या या स्टोरीमुळे प्रसाद आणि अमृता एकत्र दिसणार या चर्चाना उधाण आले आहे. पंरतु ही मालिका,चित्रपट,शॉर्टफिल्म किंवा वेबसिरीज नक्की काय असणार याविषयी प्रेक्षकांना उत्सुकता आहे.नक्की कोणत्या भूमिकेत प्रसाद आणि अमृता पाहायला मिळणार यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत.
हे देखील वाचा : नवीन मालिकेचं शुटिंगआणि अजिंक्यची तब्येत खालावली