Piyush Ranade and Suruchi Adarkar Wedding : सिनेसृष्टीत सध्या लग्नाचे वारे वाहू लागले असताना अचानक एका कलाकार जोडीच्या लग्नाच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसला. या कलाकार जोडीने एकमेकांबरोबर लग्नगाठ बांधत आपल्या वैवाहिक आयुष्याला नवीन सुरुवात केली. अभिनेता पियुष रानडे व सुरूची अडारकर हे दोघेही विवाहबंधनात अडकले. या कलाकार जोडीचे लग्नातील फोटो अचानक समोर आल्याने साऱ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. त्यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो समोर आल्याने साऱ्या चाहत्यांना सुखद धक्का बसला.
पियुष व सुरुची यांच्या लग्नातील पारंपरिक लूक समोर आला आहे. लग्नासाठी पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या सुरुचीच्या पारंपरिक दागिन्यांनी तिचं रूप खुलून आलं होतं. तर सुरुचीच्या लूकला साजेसा पियुषचा दाक्षिणात्य लूकही लक्षवेधी होता. सुरुची-पियुष यांच्या लग्नसोहळ्यातील फोटो दोघांनीही त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केले होते. या फोटोंत पियुष सुरुचीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे. दरम्यान सुरुचीच्या पारंपरिक मंगळसुत्राच्या डिझाईनने विशेष लक्ष वेधून घेतलं.
दरम्यान पियुष व सुरुचीच्या हळदी समारंभाच्या फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. रोमँटिक पोज दोघांनी हळदी समारंभासाठी तयार झालेला फोटो शेअर केला आहे. तर दुसऱ्या फोटोत हळद लागल्यानंतर दोघांनी एकमेकांना जवळ घेत फोटो काढला आहे. त्यांच्या या हळदीच्या रोमँटिक फोटोंनी साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दोघांच्याही लूकचं कौतुक केलं आहे. तर अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
तसेच याआधी या जोडीच्या रिसेप्शन लूकमधीलही खास फोटो समोर आलेले पाहायला मिळाले. सोशल मीडियावर सध्या या फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे. पियुष-सुरुची यांनी त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचे काही खास क्षण चाहत्यांबरोबर शेअर केले. या फोटोंमध्ये दोघांचा रोमॅंटिक अंदाज पाहायला मिळाला. या फोटोत पियुषने काळ्या रंगाचा फॉर्मल सूट परिधान केला होता तर सुरुचीने अबोली रंगाचा गाऊन परिधान केला होता. या फोटोत दोघेही कमालीचे सुंदर दिसत होते.