शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

चाहत्याला फटकावल्यानंतर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाले, “मी त्याला मारलं आणि…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
नोव्हेंबर 16, 2023 | 10:36 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Nana Patekar Apology

चाहत्याला फटकावल्यानंतर नाना पाटेकरांचं स्पष्टीकरण, व्हायरल व्हिडीओ पाहून म्हणाले, "मी त्याला मारलं आणि…"

नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील नानांच्या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. बरं या कृतीमुळे नाना टीकेचे धनी बनले आहेत. या व्हिडिओमध्ये नानांनी एका इसमाला नानांनी जोरदार टपली मारल्याचे एका कॅमेऱ्यात कैद झाले अन् तो व्हिडिओ काहीच क्षणात सोशल मीडियावरून वाऱ्यासारखा पसरला. दरम्यान नानांचा एक चाहता त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी पुढे आला होता. नाना सीनदरम्यान चित्रीकरण करत असताना त्यांचा हा चाहता मध्येच आला आणि त्यांच्या बाजूला उभा राहून फोटो काढू लागला. त्यावेळी नानांना चाहत्यांचा प्रचंड राग आला आणि त्यांनी रागाच्या भरात जोरदार टपली मारली. (Nana Patekar Apology)

हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान यावर नानांनी स्पष्टीकरण देत एक व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते स्पष्टीकरण देत माफी मागताना दिसत आहेत. या व्हिडिओत बोलताना नाना म्हणाले, “एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात मी एका मुलाला मारतोय. हा सीन आमच्या चित्रपटाचा भाग आहे. आम्ही रिहर्सल करत असताना पाठीमागून एक जण म्हणतो ‘ए म्हाताऱ्या टोपी विकायची आहे का?’ मी त्यात टोपी घालून असतो. तो येतो मी त्याला पकडून मारतो आणि ‘नीट वाग, उद्धट बोलू नकोस’ असे म्हणतो. त्यानंतर तो जातो”.

आणखी वाचा – Video : …अन् नाना पाटेकरांनी सेल्फी काढायला आलेल्या चाहत्याला फटकावलं, ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

#WATCH | On a viral showing him slapping a boy for taking a selfie with him, actor Nana Patekar says, "A video is going viral where I have hit a boy. Though this sequence is a part of our film, we had one rehearsal…We were scheduled to have a second rehearsal. The director told… pic.twitter.com/CVgCainRg1

— ANI (@ANI) November 16, 2023

पुढे नाना म्हणाले, “एक रिहर्सल केली, नंतर दिग्दर्शकाने पुन्हा रिहर्सल करायला सांगितली. आम्ही सुरू करणार इतक्यात या व्हिडीओत दिसणारा मुलगा तिथे आला. मला माहीत नव्हते की हा मुलगा कोण आहे, मला वाटले आमच्या टीममधला आहे. त्यामुळे सीननुसार मी त्याला मारलं आणि माझा डायलॉग म्हटला. नंतर मला कळाले की हा आमच्या टीममधला माणूस नाही. मग मी त्याला बोलवायला जात होतो, पण तो पळून गेला. त्याच्या मित्राने वगैरे हा व्हिडीओ शूट केला असेल” असं नाना म्हणाले.

आणखी वाचा – Video : “सासूबाईंना तालावर नाचवलं आणि…”, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा व्हिडीओ चर्चेत, म्हणाली, “हौशी…”

पुढे ते म्हणाले की, “मी कधीच कुणाला फोटोसाठी नाही म्हटलेले नाही. मी इथेही हजारो फोटो काढले, तिथे वाराणसीत घाटावर खूप गर्दी असते. हे चुकून झाले, मला माहीत नाही तो कुठून आला, मी आमच्या टीमचा माणूस समजून रिहर्सलचा सीन शूट केला. या व्हिडीओमुळे कोणताही गैरसमज झाला असेल तर मला माफ करा, मी असे कधीच कुणाला मारत नाही, आजपर्यंत मी कधीच असे केलेले नाही. लोक माझ्यावर खूप प्रेम करतात, त्यामुळे मी असे कृत्य कधीच करणार नाही.” असं म्हणत व्हायरल झालेल्या व्हिडीओवर नानांनी स्पष्टीकरण देत माफी मागितली.

Tags: entertainmentmarathi actornana patekarnana patekar apologynana patekar viral video
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Video : न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर जोरजोरात ओरडू लागले अविनाश नारकर, गाडी चालवत होते अन्...; व्हिडीओ व्हायरल | avinash narkar has shared a special video to celebrate India vs new zealand match viral on social media

Video : न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर जोरजोरात ओरडू लागले अविनाश नारकर, गाडी चालवत होते अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.