Actor Manoj Kumar Died at 87 : ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. ८७व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. कलाविश्वामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना कलाकर व्यक्त करत आहेत. मनोज कुमार यांच्या चित्रपटांनी बॉलिवूडमधील एक काळ गाजवला. मात्र वृद्धापकाळामध्ये त्यांना अनेक वेदना सहन कराव्या लागल्या. शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांची अगदी बिकट अवस्था होती. मनोज कुमार यांना नक्की कोणता आजार होता?, निधनापूर्वी त्यांची शारिरीक परिस्थिती कशी होती हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
मनोज कुमार यांचे शेवटे क्षण
ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी मनोज कुमार यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला. मनोज यांच्याबाबत बोलत असताना त्यांना अश्रूही अनावर झाले. मनोज व अरुणा यांची घट्ट मैत्री होती. याचबाबत त्या म्हणाल्या, “ते माझे गुरु होते. ‘उपकार’ हा माझा पहिला चित्रपट मी त्यांच्याबरोबर केला. ते एक उत्तर दिग्दर्शक, अभिनेता व निर्मात होते. त्यांची पत्नीही एक चांगली व्यक्ती होती. माणूस म्हणून मनोज खूपच उत्तम होते. एखाद्याबरोबर काम करुन जेव्हा आपण खूश होतो तेव्हा कायमस्वरुपी त्यांना स्मरणात ठेवतो”.
रुग्णालयामध्ये कशी होती परिस्थिती?
अरुणा मनोज यांच्या आजारपणाबाबत म्हणाल्या की, “वेळ व वय यांच्याविरोधात कोणीही जाऊ शकत नाही. खूप काळ ते आजारी होते. माझ्या पायाला जेव्हा दुखापत झाली तेव्हा ते ज्या रुग्णालयात होते तिथेच माझ्यावर उपचार सुरु होते. माझ्या पायाला दुखापत होती त्यामुळे मी त्यांना भेटू शकले नाही. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये पाणी भरायचं. त्यावर उपचार म्हणून ते रुग्णालयात जायचे. उपचारांनंतर काही दिवसांनी ते पुन्हा घरी यायचे. आम्हाला त्यांची कायमच आठवण येत राहिल. शेवटी आपल्या सगळ्यांना कायमचं निघून जायचं आहे”.
#WATCH | Veteran actor Manoj Kumar passed away at the Kokilaben Dhirubhai Ambani Hospital early this morning at around 3:30 AM.
— ANI (@ANI) April 4, 2025
His son, Kunal Goswami, says, "…He has had health-related issues for a long time. It's the grace of the god that he bid adieu to this world… pic.twitter.com/bTYQnXNHcF
आणखी वाचा – हत्या करुन तीन वर्षाच्या चिमुकलीला सुटकेसमध्ये भरलं; ‘त्या’ शेजाऱ्याला काय मिळालं?
मुलाने सांगितली खरी अवस्था
मनोज कुमार यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी ANI शी संवाद साधत संपूर्ण माहिती दिली. ते म्हणाले, “आज सकाळी ३.३० वाजता कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात माझे वडील मनोज कुमार यांचं निधन झालं. ते खूप काळ अस्वस्थ होते. पण हिंमतीने त्यांनी प्रत्येक प्रसंगांचा सामना केला. देवाची व साईबाबांची कृपा की त्यांनी आनंदाने या जगाचा निरोप घेतला. शनिवार (५ एप्रिल) त्यांच्यावर अत्यंसंस्कार होणार आहेत”. मनोज कुमार यांना शेवटचा निरोप देण्यासाठी अनेक मंडळी उपस्थित राहणार आहेत.