प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात त्याच्या यशामागे ही एक स्त्री असते असं म्हणतात. मग ती सर्वसामान्य व्यक्ती असो वा कलाकार मंडळी असोत. बरेचदा ही कलाकार मंडळी त्यांच्या यशामागे त्यांच्या आईचा, त्यांच्या पत्नीचा खारीचा वाटा असल्याचं सांगतात. अशातच अभिनेते महेश कोठारे यांनी आजवर नेहमीच त्यांच्या यशामागे त्यांच्या पत्नीचा वाटा असल्याचं वेळोवेळी सांगितलंय. असाच पत्नीसोबतचा एक किस्सा अभिनेते महेश कोठारे यांनी त्यांच्या ‘डॅम इट आणि बरच काही’ या पुस्तकात सांगितलाय, चला तर काय आहे तो किस्सा जाणून घेऊया आजच्या ‘जपलं ते आपलं’ या भागात. (Mahesh Kothare Nilima Kothare)
महेश कोठारे निर्मित आणि दिग्दर्शित ‘धुमधडाका’ हा चित्रपट खूप गाजला. या चित्रपटातील अशोक सराफ, निवेदिता सराफ आणि लक्क्ष्मीकांत बेर्डे यांच्या भूमिका आजही आठवत आहेत. या चित्रपटाचं शूटिंग सुरू होण्याच्या साधारण एक आठवड्याआधीचा प्रसंग महेश कोठारे यांनी सांगितला आहे. याबाबत बोलताना महेश कोठारे यांनी सांगितलं, चित्रपटच शूटिंग सुरु होणार हे जस जस जवळ येत होत तस तस माझ्या मनात भीती वाढू लागली होती.
पाहा का नीलिमा यांनी दिली महेश यांना धमकी (Mahesh Kothare Nilima Kothare)
यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, ‘गाढ झोपेतून मी दचकून उठलो. घामानं माझं अंग थबथबलं होतं. एका अनामिक भीतीचा तो झटका होता. ही कसली भीती असावी याचा विचार करू लागलो तेव्हा लक्षात आलं, की आपण हे जे चित्रपट निर्मितीचं शिवधनुष्य उचललं आहे, ते आपल्याला पेलवेल की नाही याचं. या चित्रपटासाठी मी आमचं घरदार पणाला लावलं होतं. (Mahesh Kothare Nilima Kothare)
काही गडबड झाली तर सगळंच होत्याचं नव्हतं व्हायचं! म्हणूनच मग हा चित्रपट आपण दिग्दर्शित करण्याऐवजी एन. एस. वैद्य साहेबांकडेच द्यावा का, असा विचार माझ्या मनात आला. ‘लेक चालली सासरला’चं त्यांनी अतिशय उत्तम दिग्दर्शन केलं होतं. त्यांच्याबरोबर माझे सूरही चांगलेच जुळले होते. मनात विचारांचं हे वादळ सुरू असतानाच नीलिमालाही जाग आली.
हे देखील वाचा – ‘गुडबाय किस’ अडकली वादाच्या भोवऱ्यात, क्रिती सेनन आणि ओम राऊत झाले ट्रोल
माझी ही अवस्था पाहून ती देखील घाबरली. “महेश, काय झालंय तुला?” असं त्यांनी महेश यांना विचारलं, तेव्हा महेश म्हणाले, “अगं, माझ्या छातीत धडधडतंय!” यावर नीलिमा म्हणाल्या ‘अरे कशानं पण? डॉक्टरकडे जायचं का?” त्यावर महेश म्हणाले, “डॉक्टर कशाला हवाय? तसं काही काळजीचं कारण नाहीय!” हे ऐकून नीलिमा यांनी पुनर्प्रश्न केला “अरे, मग एवढा घाबरला का आहेस?” त्यावेळी महेश बोलले, “बरोबर बोललीस तू. मी घाबरलोच आहे! ही सगळी जबाबदारी मला पेलवेल की नाही, याची खात्री वाटत नाहीय. म्हणून आपला चित्रपट मी दिग्दर्शित न करता वैद्य साहेबांनी करावा असं मला वाटतंय!” असं म्हणून त्यांनी नीलिमा यांना त्यांची सगळी मनोवस्था सांगितली. (Mahesh Kothare Nilima Kothare)
ती कथन करीत असतानाच एका क्षणी नीलिमा यांनी महेश यांना थांबवलं. आणि त्या म्हणाल्या, “खबरदार पुन्हा असं काही बोलशील तर! ‘धुमधडाका’साठी तू तुझं सर्वस्व दिलं आहेस आणि तूच हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेस! आता असले भलतेसलते विचार पुन्हा मनात आणू नकोस!”
हे देखील वाचा – ‘फायनली’ धकधक गर्ल माधुरी थिरकलीच
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, असं म्हणतात. असं म्हणत महेश यांनी लिहिलंय, मला माझ्या आयुष्यात अशा दोन स्त्रिया मिळाल्या. पहिली माझी आई जेनमा आणि दुसरी माझी पत्नी नीलिमा! नीलिमा यांनी पत्नी म्हणून महेश यांची प्रत्येक काळात साथ दिली.