एखादा ट्रेंड सुरु झाला की सर्वसामान्यांप्रमाणेच कलाकार मंडळीही तो ट्रेंड फॉलो करतात आणि त्या त्याचे व्हिडीओ बनवून चाहत्यासोबत सोशल मीडियावरून शेअर करत असतात. चाहत्यांनाही आपल्या आवडत्या कलाकाराने तो ट्रेंड फॉलो करावा असं वाटत असतं, कित्येकदा हे चाहते मंडळी एखादा ट्रेंड फॉलो करण्यासाठी आपल्या लाडक्या कलाकाराला आग्रह करतात.(Madhuri Dixit Follows Trend)
अशातच मधुमास बहरला या गाण्याची क्रेज आजही पाहायला मिळतेय. महाराष्ट्र शाहीर चित्रपटातील बहरला मधुमास हे गाणं रसिक प्रेक्षकांच्या भेटीला आलं. सना शिंदे आणि अंकुश चौधरी यांनी या गाण्यावर चित्रपटात ठेका धरला. हे गाणं जस व्हायरल झालं तस या गाण्याने एक ट्रेंडच पकडला. आणि आजही तो ट्रेंड सुरळीत सुरु आहे.
पाहा बहरला मधुमासच्या ट्रेंडवर काय म्हणाली माधुरी (Madhuri Dixit Follows Trend)
बहरला मधुमास या गाण्याची सध्या सोशल मीडियावर चांगलीच हवा आहे. या गाण्याने सर्व प्रेक्षकांना तर वेड लावलंच आहे, मात्र या गाण्यावर ठेका धरण्याचा मोह धकधक गर्ल माधुरी दीक्षितलाही आवरला नाही आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने बहरला मधुमास या गाण्यावर ठेका धरला असून त्याचा व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शन देत तिने लिहिलंय, ‘बहरला हा मधुमास नवा’ फायनली हा ट्रेंड फॉलो करतेय.(Madhuri Dixit Follows Trend)
हे देखील वाचा – भावंडांना ऐअरपोर्ट वर बघून पूजा सावंतला अश्रू अनावर
धकधक गर्ल माधुरीने केलेल्या या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. माधुरीच्या या पोस्टवर महाराष्ट्र शाहीर चित्रपटाचे दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमेंट करत माधुरीचे आभार मानले आहेत. केदार शिंदे यांनी कमेंट करत लिहिलं आहे की, ‘मनापासून धन्यवाद. माझ्या ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातलं हे गाणं आहे. तुम्ही ते सादर केलं याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर उपलब्ध आहे. नक्की पाहा एका मराठी थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र…असं त्यांनी म्हटलं आहे’.(Madhuri Dixit Follows Trend)
माधुरीच्या या डान्सने साऱ्यांनाच भुरळ घातली आहे. याआधी ही बऱ्याच कलाकार मंडळींनी या गाण्यावर ठेका धरला होता. आणि त्याचे रील्स बनवून सोशल मीडियावर पोस्ट केले होते.