समोर आलेल्या माहितीनुसार जॅकी श्रॉफ यांची पत्नी आणि टायगर श्रॉफ ची आई आयेशा श्रॉफला ५८ लाख रुपयांचा फटका बसला आहे.यासंदर्भांत मुंबई मधील सांताक्रुज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. आणि चौकशी दरम्यान ऍलन फर्नांडिस या व्यक्तीच नाव समोर आलं आहे.या व्यक्तीवर कलम ४२०,४६५.४६७,४०८ दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Ayesha Shroff Got Cheated)
पाहा नक्की काय घडलं? (Ayesha Shroff Got Cheated)
टायगर श्रॉफ आणि आयेशा श्रॉफ यांची ‘एमएमए मॅट्रिक्स’ नावाची जिम आहे. आणि या जिमचे ऍलन फर्नांडिस हे २०१८ पासून संचालक होते. टायगरपेक्षा या जिमचे काम प्रामुख्याने आयेशा आणि ऍलन पाहायचे.ऍलन यांनी भारतात आणि परदेशात ११ स्पर्धा भरवण्यासाठी कंपनीकडून खूप मोठी रक्कम घेतली होती.डिसेंबर २०१८ ते जानेवारी २०२३ पर्यंत कंपनीच्या अकाउंट मधून ५८ लाख ५२ हजार ५९१ रुपये काढले गेले अशी माहिती समोर आली आहे.(Ayesha Shroff Got Cheated)

आयेशा श्रॉफ ‘जॅकी श्रॉफ एंटरटेनमेंट लिमिटेड’ या प्रोडक्शन हाऊसची धुरा देखील सांभाळतात. या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती केली. जिमचं काम, तसेच निर्मिती क्षेत्राबरोबरच त्यांनी अभिनय क्षेत्रात ही त्यांची रुची दाखवली होती.१९८४ मधली आलेल्या ”तेरी बाहो में’ चित्रपटात त्यांनी अभिनय केला होता.
हे देखील वाचा : आजीसारखं क्रिकेटरसोबत लग्न करणार का? लग्नबाबत सारा अली खान झाली व्यक्त
तसेच आयेशा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे विशेष चर्चेत असते. तिच्या सोशल मीडियावरही ती बऱ्यचप्रमणात सक्रिय असते.टायगर श्रॉफ प्रमाणेच आयेशा देखील तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेताना बघायला मिळते. तिच्या वर्कआऊटचे अनेक व्हिडिओज ती सोशल मीडियावरून शेअर करते.