बुधवार, जून 4, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

बंगला व गाडी विकली, कपडेही नाहीत अन्…; आमिर खानच्या भाच्यावर बिकट वेळ, घरातही फक्त ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि…; म्हणाला, “मुलीसाठी…”

Saurabh Moreby Saurabh More
फेब्रुवारी 7, 2024 | 2:14 pm
in Entertainment
Reading Time: 2 mins read
google-news
actor Imran khan revealed why he decided to stay away from acting and Bollywood

बंगला व गाडी विकली, कपडेही नाहीत अन्...; आमिर खानच्या भाच्यावर बिकट वेळ, घरातही फक्त ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि...; म्हणाला, "मुलीसाठी..."

मनोरंजन विश्व हे बाहेरून दिसताना अगदी दिमाखदार अन् लाईमलाइटवालं दिसत असलं तरी या क्षेत्रात ‘दिव्याखाली अंधार’ म्हणतात तसं चित्र आहे. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांना अवघ्या एका रात्रीत ध्रुवताऱ्यासारखे अढळ पद मिळाले आहे, तर अनेकांच्या नशिबी एका रात्रीत अमावस्याही आली आहे. मनोरंजन सृष्टीतील यश मिळवणे हे जितके सहजसोपे आहे, तितकेच ते टिकवून ठेवणे अवघड आहे. मनोरंजन विश्वात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या उमेदीच्या काळात विविध भूमिका केल्या. पण ते अचानक चित्रपटसृष्टीतुन गायब झाले. या यादीत एका अभिनेत्याचं नाव वारंवार घेतलं जाते. हा अभिनेता म्हणजे आमिर खानचा भाचा इम्रान खान.

इम्रान खानने एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींबरोबर मुख्य भूमिकेत काम केलं, त्याचे चित्रपट  आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. पण तो आता अचानक या चित्रपटसृष्टीतून गायब झाला आहे. इम्रान खानने ‘जाने तू या जाने ना’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात तो अभिनेत्री जिनिलीया देशमुखबरोबर झळकला होता. या दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्याचा पदार्पणातील हा पहिलाच चित्रपट हिट झाला होता. त्यानंतर इम्रान खानने दीपिका पदुकोण, कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर अभिनय केला. पण २०१५ साली इम्रानने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. यावर अभिनेत्याने स्वत: भाष्य केलं आहे.

View this post on Instagram

A post shared by VOGUE India (@vogueindia)

वोग इंडिया’ या मासिकाबरोबर झालेल्या मुलाखतीत इम्रानने अभिनया क्षेत्रापासून दूर जाण्याचं कारण सांगितलं आहे. यावेळी तो असं म्हणाला की, “२०१६ मध्ये माझं करिअर खूपच खालच्या पातळीवर घसरलं होतं, तेव्हा मी आतून खूप तुटलो. मला तेव्हा पैशाची चिंता नव्हती. कारण सुदैवाने मी एका अशा क्षेत्रात काम करत होतो, ज्याने माझ्या पाठीशी आर्थिक पाठबळ मजबूत होतं. त्यामुळे त्या काळात मला पैशासाठी काम करण्याची गरज नव्हती. तसंच याच काळात मला एक मुलगी झाली आणि तेव्हा एक अभिनेता होण्यापेक्षा जास्त मला एक चांगला बाप होण्याची गरज आहे असं वाटलं.”

आणखी वाचा – “माणूस म्हणून त्यांनी…”, लेकाला वडिलांचं कौतुक, अशोक सराफांच्या मुलाची भावुक पोस्ट, म्हणाला, “माझ्या वडिलांनी…”

अभिनेत्याने त्याचा हा एकांतवास अनुभवण्यासाठी त्याची पूर्ण जीवनशैली बदलली आहे. पूर्वी तो पाली हिल परिसरात एका बंगल्यात राहत होता. पण आता तो वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत आहे. त्याने आपली महागडी अलिशान कार सोडली असून आता तो एक छोटी कार वापरतो. त्याने आता त्याची स्टाइल बदलली असून तो आता साध्या कपड्यांमध्ये वावरतो. तसेच  त्याच्याकडे स्वयंपाकघरात ३ प्लेट्स, २ कॉफी मग आणि फक्त १ पॅन आहेत.

आणखी वाचा – १२ वर्षांनंतर संसार मोडला, दोन मुलं अन्…; हेमा मालिनी-धर्मेंद्र यांच्या जावयाचं आहे अफेअर, आता घटस्फोट झाला आणि…

दरम्यान, इम्रानचं पहिलं लग्न बालमैत्रीण अवंतिका मलिकबरोबर झालं होतं. २०११ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांना ‘इमारा’ नावाची मुलगी आहे. पण २०१९ मध्ये दोघेही वेगळे झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. अवंतिकापासून विभक्त झाल्यानंतर इम्रान पुन्हा प्रेमात पडला असल्याची चर्चा आहे. सध्या तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत असल्याचे म्हटले जात आहे.

Tags: bollywood actorBollywood entertainment newsbollywood newsentertainment newsimran khanइम्रान खानबॉलिवूड अभिनेताबॉलिवूड बातमीमनोरंजन बातमी
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Chahat Khanna Personal life
Entertainment

आजारी असतानाही शरीरसंबंध ठेवायचा आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जून 4, 2025 | 6:00 pm
Nivedita saraf talk about ashok saraf
Entertainment

“इतरांप्रमाणे दुसऱ्यांचे डायलॉग न कापता…”, पत्नी निवेदितांकडून अशोक सराफांचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “दुसऱ्याला बरोबर घेऊन…”

जून 4, 2025 | 5:48 pm
Dipika Kakar Health
Entertainment

दीपिका कक्करची कॅन्सरवर मात, १४ तास सुरु होती शस्त्रक्रिया, नवऱ्याने दिली अपडेट, म्हणाला, “आता आयसीयूमध्ये…”

जून 4, 2025 | 4:24 pm
Jaya bachchan angry on paparazzi
Entertainment

Video : “निघा इथून, सगळेच घाणेरडे”, फोटोग्राफर्सवर अचानकच भडकल्या जया बच्चन, गाडीमध्ये बसूनही ओरडत राहिल्या अन्…

जून 4, 2025 | 3:29 pm
Next Post
Amruta Fadnavis took ukhana with her husband and deputy cm devendra's name video viral on social media

Video : "देवेंद्रजींकडून मी घेऊन आले…", हळदी कुंकू कार्यक्रमात पतीसाठी अमृता फडणवीसांचा हटके उखाणा, हसत म्हणाल्या, "ज्यांनी मारले…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.