राजकारणातील असे फार कमी कपल आहेत, ज्यांची कायम चर्चा होत असते. पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांच्याकडे एक नेहमीच ‘पॉवर कपल’ म्हणून पाहिले जाते. देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस कायमच विविध कारणांनी चर्चेत असतात. अमृता फडणवीसांना कलाक्षेत्राची आवड असून त्या उत्तम गायिका आणि समाजसेविकाही आहेत. अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या माध्यमातून चर्चेत राहत असतात. अशातच त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
सध्या सर्वत्र हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन केले जात आहे. या कार्यक्रमांना अनेकदा कलाकार किंवा राजकिय व्यक्तींना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण दिले जाते. अशातच अमृता फडणवीस यांना नागपुरातील भाजपाच्या महिला विकास आघाडीच्या हळदी कुंकू समारंभात आमंत्रित केले गेले होते. यावेळी त्यांनी या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी एक हटके उखाणा घेतला.
अमृता फडणवीसांनी उखाण्यातून विरोधकांना हाणला सणसणीत टोला !????????????@fadnavis_amruta#AmrutaFadnavis #अमृता_फडणवीस #HaldiKunku #MarathiThaska #Ukhana #Saree #Nagpur #Event #MahilaMandal #StrongWomen #SuccessFullWomen pic.twitter.com/LIyVJ2Y4V0
— Amruta Fadnavis FC (@AmrutaF_fans) February 6, 2024
अमृता फडणवीस यांनी घेतलेला उखाण्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी कार्यक्रमात उखाणा घेत त्यांनी असे म्हटले की, “ज्यांनी मारले नाकर्तेपणावर बाण, त्या देवेंद्रजींकडून मी घेऊन आले विकासाचे वाण., ते आपण सर्वांनी स्विकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करु निर्माण”.
अमृता फडणवीस या कायमच देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत असल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच त्या अनेकदा विरोधकांवरही टीकेचे बाण सोडत असतात. अशातच आता त्यांनी या उखाण्याद्वारेही विरोधकांवर निशाणा साधला आहे.