Govinda Hospitalized after Shooting Himself : बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या चर्चेत आलेला पाहायला मिळत आहे. कारण गोविंदाच्या पायाला गोळी लागली आहे. आणि उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. स्वतःच्याच परवाना असलेल्या बंदुकीतून गोळी लागल्याच ऐकून सर्वांनाच धक्का बसला. १ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या घटनेनंतर अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या गोविंदाला जवळच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. गोविंदा जुहू बंगल्यावर एकटाच असताना ही घटना घडली. पहाटे ४:४५ वाजता घरातून घाईगडबडीत निघताना हा प्रकार घडला. त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीमधून सुटलेली गोळी लागल्याची प्राथमिक महिती आहे.
आता इस्पितळातून त्याचा एक ऑडिओ समोर आला, ज्यामध्ये तो आपल्या आरोग्याबाबत अपडेट देत आहे आणि यावेळी तो चाहत्यांचे व डॉक्टरांचे आभार मानत आहे. गोविंदाच्या ऑडिओ क्लिपमध्ये तो म्हणतो, “नमस्कार. मी गोविंदा. तुम्हा सर्वांचे आशीर्वाद, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि गुरुंच्या कृपेमुळे सुखरुप आहे. मला पायाला गोळी लागली होती, पण ती काढण्यात आली आहे. मी हॉस्पिटलमधील सर्व डॉक्टरांचेही आभार मानतो. माझ्या आरोग्याबाबत केलेल्या प्रार्थनेसाठी तुम्हा सर्वांचेही धन्यवाद”, असं म्हणत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
गोविंदाच्या मॅनेजरने ANI ला सांगितले की, “ही घटना पहाटे ४.४५ वाजता घडली. जेव्हा गोविंदा एका कार्यक्रमासाठी कोलकाताला जाणार होता. तो त्याची सर्व्हिस रिव्हॉल्व्हर साफ करत होता. मात्र कुलूप उघडे राहिल्याने गोळी त्याच्या पायाला लागली. त्याला तात्काळ अंधेरीतील क्रिटी केअर रुग्णालयात नेण्यात आले. आणि तात्काळ उपचार देत पायातून गोळी बाहेर काढण्यात आली”.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये शिव ठाकरेची एंट्री, घरात येताच नतमस्तक झाला तर सूरजला उचलून घेत मारली मिठी
दरम्यान, मुलगी टीना आहुजाने ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितले की, “मी यावेळी पप्पांबरोबर आहे. पप्पा आता पूर्वीपेक्षा बरे आहेत. पप्पांचं ऑपरेशन सुरु आहे. पप्पा २४ तास आयसीयूमध्ये राहतील. घाबरण्याची गरज नाही, त्यांना गुडघ्याच्या खाली गोळी लागली आहे. रिव्हॉल्व्हर कपाटात ठेवत असताना गोळी झाडली गेली आणि रिव्हॉल्व्हर जमिनीवर पडल्याने त्यांना पायात गोळी लागली”, असल्याचं तिने सांगितलं. दरम्यान, गोविंदाजवळची परवाना असलेली बंदुक पोलिसांनी ताब्यात घेतली असून तपास सुरु आहे.