Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चं आता पाचवं पर्व अवघ्या काही दिवसांतच निरोप घेणार असल्याच समोर आलं. पाचव्या पर्वाचा शेवटचा आठवडा राहिला असून आता या पर्वात नेमका कोणता स्पर्धक विजेता ठरणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेमध्ये अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, वर्षा उसगांवकर, सूरज चव्हाण, जान्हवी किल्लेकर आणि धनंजय पोवार हे स्पर्धक सहभागी झाले होते. आता या सात स्पर्धकांपैकी सहा स्पर्धक नॉमिनेट झाले असून एका स्पर्धकाने ग्रँड फिनालेमध्ये एन्ट्री घेतली असल्याचं पाहायला मिळालं.
नुकत्याच झालेल्या भागात तिकीट टू फिनाले मध्ये बाजी मारत निक्की तांबोळी या घराची आणि सीजन पाचची पहिली फायनलिस्ट ठरली आहे. सूरजवर मात करत निक्कीने विजय मिळवला तर अरबाज कडून देण्यात आलेले कॉइन निक्कीच्या उपयोगी पडले असल्याचे समोर आलं. इतकंच नव्हे तर ‘बिग बॉस’च्या घरात फिनालेसाठीच्या टास्कमध्येही निक्कीने सुरजवर मात करत विजय मिळवला असल्याचं पाहायला मिळालं. एकूणच निक्की या घराची पहिली ग्रँड फायनलिस्ट ठरली असल्याचे समोर आले. याची एक पोस्ट कलर्स मराठी वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर करण्यात आली.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये शिव ठाकरेची एंट्री, घरात येताच नतमस्तक झाला तर सूरजला उचलून घेत मारली मिठी
या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील ग्रँड फायनलिस्ट निक्की झाली हे अत्यंत चुकीचे आहे आणि हा चुकीचा निर्णय असल्याचे म्हणत ट्रोल केले आहे. “आता पर्यंत सर्व गोष्टी भीक म्हणून मिळाल्या आहेत”, “निक्कीने अरबाजचे कपडे टाकून दिले मग त्याने दिलेले कॉईन्स का टाकले नाहीत”, “‘बिग बॉस’ काय राव अजून किती तिला वाचवणार #निक्की बचाव अभियान”, “काही पण होऊ दे या जगात पण ही जिंकली नाही पाहिजे”, ” भीक मागून मिळालं, सगळे टास्क तिच्या सोयीनुसार केले”, “निक्की जिंकली तर कलर्स मराठीला अनफॉलो करणार”, अशा कमेंट करत निक्की व ‘बिग बॉस’ या दोघांनाही नेटकऱ्यांनी ट्रोल केलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
पोस्टवरील कमेंट पाहता निक्कीचं ‘बिग बॉस’मध्ये ग्रँड फायनलिस्ट ठरणं अनेकांना खटकलं आहे. आता ‘बिग बॉस’च्या घरात उर्वरित सहा सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार पाहायला मिळणार आहे. मिड वीक एलिमिनेशनमधून नेमका कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.