Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ हे पर्व विशेष गाजताना दिसलं. यंदाच्या या पर्वात सगळेच स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसले. आता या पर्वाचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. या पर्वात स्पर्धकांमध्ये विविध नाती तयार होताना दिसली. दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर या दोन स्पर्धकांमध्ये मैत्रीचं नातं पाहायला मिळालं. निक्की तांबोळी व जान्हवी किल्लेकर यांनी अगदी पहिल्या दिवसापासून ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. दोघींमधील मैत्रीचा बॉण्डही पहिल्या दिवसापासून पाहायला मिळाला.
अगदी पहिल्या दिवसापासून निक्कीची पाठराखीन बनून जान्हवी घरात वावरू लागली. निक्की जशी वागेल तसं जान्हवीही वागू लागली. मात्र भाऊच्या धक्क्यावर निक्कीने टीम A मधून एक्झिट घेतली. रितेश देशमुखने टीम ए मधील स्पर्धकांचा खरा चेहरा निक्की समोर आणताच ती टीम ए मधून वेगळी झाली. शिवाय यावेळी रितेश देशमुखने जान्हवीचीही चांगलीच शाळा घेतली. जान्हवीला त्याने निक्कीची सावली अशी उपमा दिली.
जान्हवी व निक्की यांच्या मैत्रीत दुरावा आला. मैत्री होती तेव्हा अनेकांनी निकीची सावली म्हणत तिला ट्रोल केलं. निक्कीने अपमान केला तर जान्हवीनेही मराठीतील दिग्गज कलाकार मंडळींचा अपमान केला. यावरुन रितेश देशमुखने जान्हवीची चांगली शाळा घेतली. त्यानंतर निक्की व जान्हवी एकमेकींच्या विरोधात खेळू लागल्या. भांडणांमध्ये निक्कीने असंही म्हटलं होतं की, काही झालं तरी या टीम ए मधील स्पर्धकांना ट्रॉफी जिंकू देणार नाही. जान्हवी व निक्की यांनी एकमेकींशी बोलणं पूर्णता बंदही केलं.
यानंतर कालच्या भागात, जान्हवी व निक्की पुन्हा एकदा एकत्र आलेल्या पाहायला मिळाल्या. दोघींनी एकत्र येत स्ट्रॅटर्जी प्लॅन केलेला दिसला. एकत्र बसून गेम बाबत त्या बोलताना दिसल्या, यावरुन त्यांनी इतके दिवस मैत्री नसल्याचं नाटक केलं का असा सवाल उपस्थित होतो. दोघींमध्ये खरंच मैत्री आहे का?, की हे नाटक होतं असे अनेक प्रश्न संभ्रमात पाडत आहेत.